Home बुलढाणा बारलीगा येथील दैनिय रस्त्यांची दुर्दशा ….

बारलीगा येथील दैनिय रस्त्यांची दुर्दशा ….

22
0

आशाताई बच्छाव

1000661333.jpg

बारलीगा येथील दैनिय रस्त्यांची दुर्दशा ….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
सिंदखेडराजा :-बुलढाणा सिंदखेडराजा तालुक्यातील मौजे बारलिंगा येथील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्याने ये जा करणे अत्यंत कसरतीचे झाले आहे महाविद्यालयीन मुलांना शाळेत दुसरबीड ला जाण्यासाठी याच रस्त्याने जावे लागते त्यांना सुद्धा या रस्त्याने मोठी कसरत करावी लागत आहे या गावाला बसची व्यवस्था नसून प्रायव्हेट गाड्या हा रस्ता खराब झाल्यामुळे बंद आहे आठवडी बाजार दुसरबीड ला जाण्यासाठी गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते तसेच हॉस्पिटलला जाताना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता दीड कि.मी. चा असून सदर रस्ता हा जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे येतोय या विभागाने या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे तरी याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे नाहीतर येणाऱ्या काळात पुढार्‍यांना गावबंदी व तसेच येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत गावकरी असून याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे

Previous articleब्रेकिंग! काँग्रेसमध्ये संजय राठोड यांची लॉटरी लागली?
Next articleशासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे पुरस्कार जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here