Home बीड परळीत २१ ऑगस्ट पासून ०५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव

परळीत २१ ऑगस्ट पासून ०५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव

36
0

आशाताई बच्छाव

1000657817.jpg

परळीत २१ ऑगस्ट पासून ०५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव

कृषी, पशु प्रदर्शनासह शेतकरी उपयोगी अनेक उपक्रमाचे आयोजन: कृषीमंत्री धनंजय मुंडे

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि:१९  रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे येत्या २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक महत्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लावलेले नवनवीन शोध, विविध आधुनिक उपकरणे, शासनाचे व अन्य नवनवीन उपक्रम तसेच उत्पादने यांची माहिती खरेदी करता यावे या दृष्टीने महोत्सव अत्यंत महत्त्वाचा व शेतकऱ्यांसाठी लाभदायक असून, या महोत्सवाचे उद्घाटन २१ ऑगस्ट दुपारी १२:०० वाजता मा. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने विविध आधुनिक यंत्र सामुग्रीं, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, नवनवीन संशोधन, चर्चासत्रे तथा विविध उत्पादने, पशूंच्या विविध प्रजाती यांच्यासह अनेक अर्थांनी हा महोत्सव महत्वपूर्ण ठरणार आहे. तत्पूर्वी आज सकाळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्याच्या समवेत कृषी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, कृषी विभागासह संचालक श्री दिवेकर, श्री मोठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांच्यासह ज्येष्ठ नेते वाल्मीक कराड, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, यासह कृषी, महसूल, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी या अधिकाऱ्यांसमवेत कृषी महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या परळी शहरातील बाजार समितीच्या मैदानावर सुरू असलेल्या संपूर्ण तयारीची पाहणी केली. यासाठी मुख्य कार्यक्रमसाठी उभारण्यात येत असलेला मंडप, आसन व्यवस्था त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या शेकडो स्टॉल, पार्किंग व्यवस्था, भोजन व्यवस्था, सुरक्षा आदी सर्व बाबींची पाहणी करून सर्व व्यवस्थापन सुखपणे करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिले आहेत.

Previous articleश्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती(लघु आळंदी) येथे श्रावण महिन्यानिमित्त वार्षिक संजीवन समाधिकाल महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह. 
Next articleशनिशिंगणापुरात भाविकांची मांदियाळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here