आशाताई बच्छाव
मुंबई,(कार्यालयीन प्रतिनिधी)- हवामान खात्याने कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी खानदेशातील जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे तसेच नाशिक जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागातही पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस बरसणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव जिल्ह्यात आज पाऊस पडणार आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे