Home जालना भ्रष्टाचार देशाला लागलेली कीड मुळापासून उखडून टाकण्यासाठी महिलांनी व तरुणांनी पुढाकार घ्यावा-राष्ट्रीय...

भ्रष्टाचार देशाला लागलेली कीड मुळापासून उखडून टाकण्यासाठी महिलांनी व तरुणांनी पुढाकार घ्यावा-राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा खंडापूरकर

156
0

आशाताई बच्छाव

1000657699.jpg

भ्रष्टाचार देशाला लागलेली कीड मुळापासून उखडून टाकण्यासाठी महिलांनी व तरुणांनी पुढाकार घ्यावा-राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा खंडापूरकर
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 19/08/2024
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी परभणी येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेले कोकोनट येथील निसर्गरम्य असलेल्या फार्म हाऊसवर परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली .या बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती.यांवेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे.ती मुळापासून उखडून टाकण्यासाठी देशातील महिलांनी व तरुणांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी केल. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील सर्वच पक्षातील राजकीय पुढारी यांचे हात भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले असल्यामुळे भ्रष्टाचार प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे म्हणून भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्यासाठी सर्व घटकातील महिलांनी व तरुणांनी पुढाकार घेऊन संविधानिक कार्याला गती देणे गरजेचे आहे त्याचबरोबर महिलावर दलित, वंचित, पंडित घटकातील कुटुंबावर होत असलेले अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आत्मनिर्भय होऊन काम करावं तरच आपण खऱ्या अर्थाने सर्व सामान्य माणसाला नाय देण्याचे काम करत असल्याचं मत राष्ट्रीय अध्यक्ष यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष पंडितराव तिडके यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व संघटनेचे कार्य गतिमान करण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स हुमान राईट मिशन ,सामाजिक न्याय संघटना हा एक मात्र पर्याय आहे. इतर कुठल्याही राजकीय पक्षाच्या माध्यमातून संविधानिक कार्याला गती मिळाल्याचं दिसत नाही. प्रशासकीय कार्यालय मध्ये पारदर्शकता दिसत नाही. त्यामुळे सर्व समाज घटकातील बांधवांनी या संघटनेच्या माध्यमातून काम करावं आणि संविधानिक कार्याला गती द्यावी असे आवाहन त्यांनी केले. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परभणी जिल्हा अध्यक्ष अनंता कचाले, जिल्हाध्यक्षा रेखाताई मनेरे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमासाठी परभणी, हिंगोली, नांदेड येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये परभणी पासून आठ किलोमीटर असलेल्या कोकोनट या निसर्गरम्य वातावरणामध्ये आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील बाबा खंडापूरकर, राष्ट्रीय सरचिटणीस राजू पाटील सीपांळकर, राष्ट्रीय संघटक अरुण चव्हाण देशमुख, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पंडितराव तिडके, प्रदेश कार्याध्यक्ष रामदास गिरे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अमरजीत सिंग कॉलरा, मराठवाडा विभाग अध्यक्ष शंकरराव देशमुख ,मराठवाडा विभागीय अध्यक्षा स्वरा मराठे, हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष रमेश कुटे ,नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकररावजी मावलगे ,नांदेड जिल्हा अध्यक्ष गजानन गव्हाणे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष वंदनाताई थिटे ,परभणी जिल्हाध्यक्ष अनंत कचाले ,परभणी जिल्हा अध्यक्षा रेखाताई मनरे ,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा विभागीय मेळावा संपन्न

Previous articleस्पंदन फाउंडेशन गडचिरोली च्या वतीने मा. आमदार डॉ. परिणय फुके यांचा सत्कार सोहळा..
Next articleपावसाबाबतची मोठी बातमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here