Home भंडारा “अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस” हाच संपूर्ण व्यसनमुक्तीचा पर्याय – पुरूषोत्तम भिवगडे

“अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस” हाच संपूर्ण व्यसनमुक्तीचा पर्याय – पुरूषोत्तम भिवगडे

27
0

आशाताई बच्छाव

1000655612.jpg

“अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस” हाच संपूर्ण व्यसनमुक्तीचा पर्याय – पुरूषोत्तम भिवगडे

ग्रामपंचायत चारगाव या आदर्श गावी घेतली निःशुल्क व्यसनमुक्तीची जनजागरण सभा

संजीव भांबोरे
भंडारा ,(जिल्हा प्रतिनिधी)खरंच आज आपले अनामिक व कायमचे मद्यमुक्त राहणारे अल्कोहोलीक्स ॲनॉनिमसच्या बांधवांनी जे आपल्या मद्यसक्त जीवनातील कटू अनुभव कथन केले आणि ते त्यांना मान्य करावे लागले की मद्यपाश हा एक जीवघेणा आजार आहे, आणि याच बांधवांच्या सोबरायटीत राहून व यांच्या सभेला जाऊन कितीही दारू पिणा-या बांधवात हमखास सुधारणा होऊ शकते ते म्हणजे अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस ही जागतिक संघटना होय” असे प्रतिपादन चारगांवचे तंटामुक्त समिती अध्यक्ष पुरुषोत्तम भिवगडे यांनी रवि. १८ ऑगस्टला जि. प. प्राथ‌. शाळेत आयोजित जनजागरण सभेला केले. येथे निर्णय समुह सौंदड रेल्वे, युनिटी समुह साकोली व निर्माण समुह बाम्हणी खडकी यांच्या वतीने निःशुल्क व्यसनमुक्ती सभा आयोजित झाली.
आदर्श गटग्रामपंचायत म्हणून ख्याती असलेल्या चारगावं सुंदरी येथे अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस – आत्मसमर्पण आंतरसमुह ( भंडारा गोंदिया गडचिरोली ) वतीने जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला मंचावर अध्यक्ष तंटामुक्त समिती पुरूषोत्तम भिवगडे, अतिथी उपसरपंचा लता भिवगडे, पोलीस पाटील विरेंद्र सुतार, पोलीस पाटील सुंदरी पुरूषोत्तम भोयर, मुख्याध्यापक परशुरामकर, तुकाराम लंजे, पुष्पा गणविर आदी उपस्थित होते. झालेल्या जनजागरण सभेत अगदी विनामुल्य सेवा देणाऱ्या संघटना “आत्मसमर्पण आंतरसमुह” ( भंडारा गोंदिया गडचिरोली ) अंतर्गत सौंदड रेल्वे, साकोली, बाम्हणी खडकी, लाखांदूर, भंडारा, ब्रम्हपुरी, वडसा येथून आलेल्या अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस बांधवांनी “मद्यपाश एक जीवघेणा आजार” विषयावर आपले आत्मनुभव कथनांतून उपस्थितांना मार्गदर्शन केले. जनजागरण सभेचे दु. १२ ते ०२ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. यात जीवन व्यसनमुक्त कसे जगावे आणि व्यसनमुक्त जीवनाचा खरा आनंद काय हे निश्चितपणे जाणून घेण्यासाठी सुंदर विचार व्यक्त केले. सदर जनजागरण सभेला संचालन प्रमोद एम यांनी केले तर आभार पुष्पा गणविर यांनी केले. सभेसाठी तंटामुक्त समिती सदस्यगण, चारगाव सुंदरी ग्रामपंचायत कमेटी यांसह अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस युनिटी समुह साकोली, निर्णय समुह सौंदड रेल्वे, निर्माण समुह बाम्हणी खडकी, मानवता समुह लाखांदूर, उजाला समुह भंडारा येथील सर्व एए बांधवांनी सभा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

Previous articleसाई सोशल अँन्ड स्पोर्ट्स फाऊंडेशन व आँल इंडिया वुमेन राइटस असोशियन कडून वर्ल्ड बेस्ट सिस्टर अवाँर्ड समारंभ संपन्न
Next articleआयुर्वेदिक दवाखाना लाखोरी येथे आयुर्वेदिक शिबिर संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here