Home बुलढाणा पळशी (झा.) गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला सरपंच उपसरपंच यांचा सत्कार

पळशी (झा.) गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला सरपंच उपसरपंच यांचा सत्कार

15
0

आशाताई बच्छाव

1000654694.jpg

पळशी (झा.) गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला सरपंच उपसरपंच यांचा सत्कार

ज्ञानेश्वर पाटील युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ बुलढाणा:
तालुक्यातील पळशी झाशी ग्रामपंचायतचा सरपंच पदाचा पदभार घेताच गावामध्ये पारदर्शक विकास कामे व उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत तसेच गाव विकासासाठी विविध उपक्रम राबवित असल्याबाबत पळशी झाशी येथील गावकऱ्यांच्या वतीने सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे व उपसरपंच पंचफुलाबाई पवार यांचा शाल श्रीफळ व साडी देऊन सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायत म्हटलं की गावकऱ्यांच्या नेहमी तक्रारी चालूच असतात परंतु पळशी झाशी ग्रामपंचायत गावकऱ्यांसाठी सदैव तत्पर असते, गावामध्ये विविध योजनांचे कॅम्प असो किंवा गावातील रस्त्यांची,पाण्याची समस्या असो पळशी झाशी ग्रामपंचायतीने सर्व कामात पुढाकार घेऊन सर्व कामे केली. पळशी झाशी ग्रामपंचायतचा उत्कृष्ट कारभार हा संग्रामपूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. गावातील नागरिकांनी स्वखुशीने सरपंच व उपसरपंच यांचा दिनांक 15 ऑगस्ट रोजी सत्कार घेतला, यावेळी सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे व उपसरपंच पंचफुलाबाई पवार यांचा गावकऱ्यांनी केलेला सत्कार पाहून स्वतः सत्कारमूर्ती भारावून गेल्या, याठिकाणी
सरपंच पती राहुल मेटांगे यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत मध्ये सौ लताबाई मारोडे, वनिताताई भगत, माजी सरपंच द्रौपताबाई इंगळे, नलिनीताई अढाव,निकीताताई गिरी,मुक्ताताई चितोडे,
वैशालिताई मारोडे,संजवणीताई ठाकरे,गोकुळाताई ठाकरे, अनिताताई बनन्तकर,सविताताई चितोडे,कल्पनाताई चितोडे, मंगलाताई कारांगळे, ज्योतिताई आमले, कांशीराम कुयटे, वसंता मारोडे,श्रीकृष्ण भगत, राजू कोकाटे, विष्णू येनकर, बाळू चितोडे, अनिल शिरसोले, गजानन कोठे, वैभव तायडे,अविनाश देशमुख, प्रफुल मारोडे, अमित मारोडे, सुधाकर शिरसोले, गणेश खरचणे, ज्ञानेश्वर मारोडे, नरेंद्र रायलकर इत्यादी गावकरी मंडळी उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी केलेला सत्कार पाहून मन भारावून गेले, त्यामुळे आणखीन नवीन काम करण्याची ऊर्जा तयार होते गावकऱ्यांचे समाधान हीच आमच्या कामाची खरी पावती आहे असे भावनिक उद्गार सौ. प्रियांकाताई राहुल मेटांगे. सरपंच ग्रा. प. पळशी (झा.) यांनी काढले.

Previous articleपळशी (झा.) गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला सरपंच उपसरपंच यांचा सत्कार
Next articleविश्व हिंदू परिषद बजरंग दल कडून ओंकारेश्वर ते पातुर्डा कावड यात्रा! १२ दिवसात २४० किलोमीटर चालणार कावडधारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here