Home मुंबई मुंबई येथील मराठी पत्रकार भवन येथे एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा च्या वतीने...

मुंबई येथील मराठी पत्रकार भवन येथे एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा च्या वतीने पत्रकार परिषद संपन्न

52
0

आशाताई बच्छाव

1000652601.jpg

मुंबई येथील मराठी पत्रकार भवन येथे एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा च्या वतीने पत्रकार परिषद संपन्न

रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे डॉ ,सुरेश माने, आजाद समाज पार्टी प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे, राजेंद्र गवई गटाचे आनंद खरात, राजरत्न आंबेडकर गटाचे सिद्धार्थ सपकाळ प्रामुख्याने उपस्थित

 

मुंबई ( संजीव भांबोरे )राज्यात आंबेडकरवादी अधिक संघटना आहेत. ज्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करीत असतात. मात्र आंबेडकरी मतांची विभागणी होत असल्याने एकही गट आपल्या उमेदवारांची अमानत रक्कम सुद्धा वाचवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.राखीव जागेवर सुद्धा तीच परिस्थिती आहे ‌काँग्रेस ,राष्ट्रवादी, काँग्रेस ,भाजप ,सेना किंवा इतर पक्षाकडून राखीव जागेतून निवडून येणारे प्रतिनिधी आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधित्व न करता ज्या पक्षाच्या तिकीटवर निवडून आले त्याच पक्षाची हुजेरीगिरी करण्यात मग्न असतात. म्हणून आंबेडकरी समाजाचे प्रश्न जसेच्या तसे पडून असतात.आंबेडकरी समाजाला दिल्या जाणाऱ्या योजनेवरील निधी दिवसेंदिवस कमी केल्या जाते. नोकरीतील आरक्षण खाजगीकरणाच्या नावाने संपवण्यात आला. सुप्रीम कोर्टाने आरक्षणात वर्गीकरण करून पुन्हा एसटी ,एससी चे आरक्षण धोक्यात आलेले आहे.विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात नाही . अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. अशा अनेक समस्या असून सुद्धा लोकसभेत किंवा विधानसभेत राखीव जागेवर निवडून येणारे प्रतिनिधी एकही शब्द बोलत नाही . आंबेडकरी समाजाच्या किंवा इतर मागास समाजाचे प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी खरे आंबेडकरवादी पक्षाचे प्रतिनिधी संसदेत किंवा विधानसभेत जाणे गरजेचे आहे . त्याशिवाय एसी ,एसटी तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या समस्या सुटू शकणार नाही आणि राज्यात आंबेडकरवादी सर्व गटांना एकत्रित करून राज्यात एक शाश्वत आंबेडकरवादी पक्ष स्थापन करण्यासंबंधी आंबेडकरवादी संघटनेच्या सर्वच राज्य
अध्यक्षांची बैठक दिनांक 14 /7 /2024 रोजी नागपूर येथील रवी भवन येथे पार पडली व राज्यातील सर्वच आंबेडकरवादी पक्षांची संयुक्त आघाडी करण्याचे एकमताने ठरविण्यात आले .तसेच एकत्रीकरण करण्यासंबंधी आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक मुंबई येथे घेऊन पुढील रणनीती ठरविण्याचे ठरवण्यात आले. बैठकीत ठरल्यानुसार आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य अध्यक्ष यांची संयुक्त बैठक मुंबई येथे दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी पद्मशाली सभागृह नायगाव मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीला रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुरेश माने , आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांच्या आदेशानुसार अशोक लोंढे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांचे आदेशानुसार आनंद खरात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या पक्षाचे सिद्धार्थ सपकाळ प्रामुख्याने उपस्थित होते.वरील पत्रकार परिषदेला आयोजक माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे अध्यक्ष रिपब्लिकन एकीकृत समिती भंडारा, अमृत बनसोड मुख्य संयोजक एकीकृत रिपब्लिकन समिती ,रोशन जांभुळकर मुख्यनिमंत्रक ,प्राध्यापक डॉ.सुरेश खोब्रागडे, प्राध्यापक रमेश जांगळे,
जिल्हा महासचिव आसित बागडे , माझी पीएसआय दिलीप वानखेडे , सामाजिक कार्यकर्ते विजय भोवते , सामाजिक कार्यकर्ते शिवदास गजभिये,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजेश मडामे , यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleपानकनेरगाव येथील आकाश देशमुख यांना आरोपी व पी.एस.आय. संभाजी खांडे यांनी केले आत्महत्तेस प्रवृत्त.
Next articleआयुर्वेद मानवी जीवनासाठी संजीवनी – बाबासाहेब दिघे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here