Home जालना भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त मंगळवारी काँग्रेसपक्षाचा महामेळावा महिला काँग्रेस...

भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त मंगळवारी काँग्रेसपक्षाचा महामेळावा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार,यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

25
0

आशाताई बच्छाव

1000652552.jpg

भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त मंगळवारी काँग्रेसपक्षाचा महामेळावा
महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार,यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन
जालना (दिलीप बोंडे प्रतिनिधी) ः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वतीने दि. 20 ऑगस्ट 2024 मंगळवार रोजी भारतरत्न, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त बी. के. सी. मैदान मुंबई येथे दुपारी 4 वाजता महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जयंतीदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
याप्रसंगी जालना जिल्ह्यातील काँग्रेसपक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हा काँग्रेस महिला कमिटीच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, प्रदेश काँग्रेसच्या सदस्या सौ सुषमाताई पायगव्हाणे, यांनी महिला काँग्रेस ला संयुक्तरित्या आवाहन केले आहे.
या महामेळाव्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मलिकाअर्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नथाला,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गटनेते सतेज बंटी पाटील, खा. वर्षाताई गायकवाड आदि नेते उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी जालना जिल्ह्यातील सर्व महिला काँग्रेस पदाधिकारी  सदस्य सर्व विभागाचे महिला जिल्हाध्यक्षा सर्व सेलच्या जिल्हाध्यक्ष आणि महिला कार्यकर्त्यांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश काँग्रेसच्या सदस्या सौ. सुषमा पायगव्हाणे, शहराध्यक्षा शितल तनपुरे, मंथूरा सोळुंके, लतीफा शेख, सविता गायकवाड,मंगल  खांडेभराड आदिंनी केले आहे

Previous articleमनोज जरांगेंनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Next articleपांघरुण गावी वृक्षारोपण संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here