Home जालना वर्धापन दिनानिमित्त ऍम्ब्युलन्स ड्रायव्हरचा सत्कार सोहळा

वर्धापन दिनानिमित्त ऍम्ब्युलन्स ड्रायव्हरचा सत्कार सोहळा

28
0

आशाताई बच्छाव

1000652536.jpg

वर्धापन दिनानिमित्त ऍम्ब्युलन्स ड्रायव्हरचा सत्कार सोहळा
जालना (दिलीप बोंडे प्रतिनिधी) : नागपूर-पुणे हायवे वरील कन्हैया नगर चौफुली पॉईंट येथील ज.न.म संस्थान नानिजधाम विनामुल्य ॲम्बुलन्स सेवेला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्त त्या ॲम्बुलन्सच्या दुसरा वर्धापन दिनानिमित्त ॲम्बुलन्सला हार घालून नारळ फोडून व ॲम्बुलन्स ड्रायव्हर राजू चव्हाण व दक्षता अधिकारी योगेश बहुले यांचे कौतुक व सत्कार करण्यात आला.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नानिजधाम यांच्या माध्यमातून चालणारी विनामूल्य ॲम्बुलन्स सेवा ही रस्त्यावरील अपघात ग्रस्त व्यक्तींसाठी 24 तास कार्यरत असते कन्हैयानगर चौफुली ते देऊळगाव राजा तसेच कन्हैया नगर चौफुली ते सिंदखेड राजा पर्यंत व कन्हैया नगर चौफुली ते सोमठाणा फाटा बदनापूर पर्यंत या राष्ट्रीय महामार्गावरती कोठेही वाहनांचा अपघात झाला तर 8888263030 किंवा 8999940875 या भ्रमणध्वनी वरती कॉल केल्यास ही ॲम्बुलन्स तात्काळ त्या अपघात ठिकाणी पोहोचते आणि त्या अपघात ग्रस्त व्यक्तींना लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात दाखल करते जेणेकरून त्या व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत होईल अशा प्रकारे ही ॲम्बुलन्स 24 तास विनामूल्य अपघातग्रस्त व्यक्तीकडून एकही रुपया न घेता मागील एक वर्षापासून या हायवे वरती कार्यरत आहे. आतापर्यंत या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मागील दोन वर्षा मध्ये एकूण 101 अपघातांचे कॉल अटेंड करण्यात आले. यादरम्यान या ठिकाणी उभी असलेली ज. न. म. संस्थानची  विनामूल्य ॲम्बुलन्स सेवेच्या च्या माध्यमातून एकूण 207 रुग्णांचे  प्राण वाचवण्यात आले. व अशा प्रकारे या ॲम्बुलन्स चे कार्य अविरतपणे चालू आहे. तरी या वर्धापन दिनानिमित्त  जिल्हा निरीक्षक विजय देशपांडे, जिल्हा अध्यक्ष नवनाथ पवार, जिल्हा महिला अध्यक्ष सौ. वर्षाताई तोटे, सामाजिक उपक्रम प्रमुख देवीलाल

Previous articleकोलकत्ता येथील दुर्देवी प्रकरणाचा बदनापूर डॉक्टर्स असोशिएशनच्या वतीने तीव्र निषेध : काळी फित बांधून रुग्णसेवा
Next articleमनोज जरांगेंनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here