आशाताई बच्छाव
‘समय की पुकार’ उलझनो से उजालो की और…
प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने पाच दिवशीय शिबिराचे आयोजन
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- मनशांतीसाठी प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय वाशीमच्या वतीने ‘समय की पुकार’उलझनो से उजाले की और पाच दिवशीय विशेष शिबिराचे आयोजन दि. २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ७ ते ८.३० पर्यंत पटेल ले आऊट शिवाजी हायस्कुल समोर तर संध्याकाळी ६ ते ७.३० पर्यंत वरदानी भवन सिव्हील लाईन सर्कीट हाऊस समोर होणार आहे.
आधुनिक जगात माणसांच्या मनशांतीसाठी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने पाच दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २८ ऑगस्ट रोजी पहिल्या दिवशी स्वजागृती आणि अनुभूती या विषयावर मार्गदर्शन करून प्रवचन करण्यात येणार आहे. तर दुसर्या दिवशी २९ ऑगस्ट रोजी हे भगवान आखीर आप हो कहा याची अनुभूती या विषयावर मार्गदर्शन करून प्रवचन करण्यात येणार आहे. तिसर्या दिवशी ३० ऑगस्ट रोजी भगवान के साथ हॉटलाईन कनेक्शन संबधो की अनुभूती या विषयावर मार्गदर्शन करून प्रवचन करण्यात येणार आहे. चौथ्या दिवशी ३१ ऑगस्ट रोजी आखिर कल क्या होगा समय की पुकार की अनुभूती या विषयावर प्रवचन करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर शेवटच्या अन् पाचव्या दिवशी १ सप्टेंबर रोजी मेरे साथ क्यो एैसा ही होता रहेगा कर्मी की गृह्य गती या विषयावर प्रवचन करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सर्व विषयावर आदरणीय राजयोगीनी ब्रम्हाकुमारी इंदीरा दिदी मांऊट आबु राजस्थान ह्या मार्गदर्शन करणार असून त्या आंतरराष्ट्रीय प्रवक्ता आहेत. तरी शरीराच्या व मनाच्या शांतीसाठी या पाच दिवशीय शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय वाशीमच्या वतीने करण्यात आले आहे.