Home जालना प्राचार्य प्रो.डॉ विलास आघाव यांना भारत शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान.

प्राचार्य प्रो.डॉ विलास आघाव यांना भारत शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान.

34
0

आशाताई बच्छाव

1000614491.jpg

प्राचार्य प्रो.डॉ विलास आघाव यांना भारत शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान.
प्राचार्य प्रो.डॉ विलास आघाव यांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक ६ ऑगस्ट २०२४

सविस्तर वृत्त असे की, दिनांक ५ ऑगस्ट रोजी हिंगोली
येथील आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ विलास आघाव यांचा जी.बी. मुरारका महाविद्यालय,शेगाव येथे रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे यांच्या वतीने पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनिल मुरारका , सचिव कांतीलाल व्यास,संस्थेचे विश्वस्त रवी मुरारका ,प्राचार्य डॉ.बी एस पाटील, प्राचार्य डॉ.मनोहर पाटील, प्राचार्य डॉ.प्रमोद पवार , प्राचार्य डॉ.प्रवीणसिंग गिरासे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.सचिन नांदे, गुरुकुल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.संभाजी पाटील, प्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी,डॉ.मोहन पावरा ,प्राचार्य डॉ.विलास आवारी ,रायपूर (छत्तीसगड)येथील प्रो. शिल्पी बोस,प्राचार्य डॉ.प्यारेलाल सूर्यवंशी, (खंडवा) मध्य प्रदेश येथील सुनील गोयल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनोद इंगळे,डॉ.विनोद गायकवाड उपस्थित होते.
रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन, धुळे यांच्यावतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य प्रो.डॉ.विलास आघाव यांना सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन शिक्षक रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले .फाउंडेशनच्या वतीने
शैक्षणिक ,सामाजिक व राष्ट्रीय कार्यांचे मूल्यमापन करीत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
प्राचार्य प्रो.डॉ विलास आघाव यांनी आदर्श महाविद्यालयात तीस वर्षे राज्यशास्त्र विषयाच्या अध्यापनाचे कार्य केले आहे. स्वारातीम विद्यापीठ नांदेड राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या ठिकाणी अभ्यास मंडळावर कार्यरत आहेत .तसेच त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या गुणामुळे विविध पातळीवरचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.
प्राचार्य प्रो.डॉ.विलास आघाव यांना भारत शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोरजी काबरा, उपाध्यक्ष गणेशप्रसादजी चौधरी, सचिव रामचंद्रजी कयाल, कोषाध्यक्ष बद्रीनारायणजी बगडिया व सर्व कार्यकारणी सदस्य तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रमेश दळवी, एम.सी.व्ही.सी.समन्वयक डॉ. संजय कयाल अधीक्षक दिलीप दुबे, आस्थापना प्रमुख कैलास डिडाळे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे तसेच विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleदेवळा येथील युवा संवाद मेळाव्यात युवकांकडून केदा आहेर यांच्या उमेदवारीची मागणी
Next articleमिरची वाहतूक करणारे वाहन भरधाव वेगाने धावतात अपघाताची शक्यता पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here