Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे भाजप कार्यकारिणीचे महाअधिवेशन: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, लाडकी...

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे भाजप कार्यकारिणीचे महाअधिवेशन: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १५ ऑगस्टनंतर.

35
0

आशाताई बच्छाव

1000614454.jpg

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे भाजप कार्यकारिणीचे महाअधिवेशन: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १५ ऑगस्टनंतर.
दैनिक युवा मराठा.
पी. एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती .
शेंदुरजना घाट.
लाडकी बहीण योजना विरोधक घाबरले आहेत. याबाबत ते नकारात्मक प्रचार सुरू झाला आहे. या योजनेचे पैसे कुठून आणणार, हा प्रश्न विरोधकांना पडला असून, काँग्रेसचे नेते कोर्टात गेले आहे, आम्ही पैसे देणारच आकाश नंतर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित केली जाणार असून, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीबाबतचे अनुदानित दिले जाणार आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. शहरातील रामदेव बाबा मंगल कार्यालयात आयोजित जिल्हा ग्रामीण भाजप कार्यकारिणीच्या महाआधीक्षणात ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आ. प्रताप अडसड, चैनसुख संचेती, माजी आमदार केवलाराम काळे, रमेश बुंदिले, किरण पातुरकर, विनोद गुढधे, रेखा मावसकर, दत्ता गेडाम, मोर्शी विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. मनोहर आडे, अमित कुबडे, शहराध्यक्ष योगेश खास बागे, ज्योती मालवीय, डॉ. वसुधा बोंडे, प्रदेश प्रवक्ता शिवराव कुलकर्णी, जिल्हाप्रमुख प्रा. दिनेश सूर्यवंशी, नवेदिता चौधरी, तुषार भारतीय, आधी नेते गम उपस्थित होते. खासदार अनिल बोंडे म्हणाले, विरोधकांनी खोटे बोलून लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी आपला पराभव केला. परंतु, खोटं जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी पेटून उठावे ही बाब गर्जैचे आहे. सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत तर आभार माजी पंचायत समिती सदस्य अंजली तुमडाम यांनी मानले. फडणवीस संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीबाबतचे अनुदान दिले जाणार आहे. वैनगंगा नळगंगा प्रकल्प मंजूर करून विदर्भाचे चित्र बदलले जाईल. विरोधकांच्या अप्रचाराला बळी न पडता आपली भूमिका तटस्थपणे मांडा व महायुतीचे सरकार आणण्यासाठी मैदानात उतरा, असे आव्हान देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी यावेळी केली आहे. या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस व अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here