Home अमरावती विदर्भ महारोगी सेवा मंडळ ही संस्था नसून नि:स्वार्थ सेवेचे तपोवन: वनराईचे गिरीश...

विदर्भ महारोगी सेवा मंडळ ही संस्था नसून नि:स्वार्थ सेवेचे तपोवन: वनराईचे गिरीश गांधी यांचे प्रतिपादन; अमरावती तपोवन संस्थेला लोक गौरव पुरस्कार प्रदान.

24
0

आशाताई बच्छाव

1000614452.jpg

विदर्भ महारोगी सेवा मंडळ ही संस्था नसून नि:स्वार्थ सेवेचे तपोवन: वनराईचे गिरीश गांधी यांचे प्रतिपादन; अमरावती तपोवन संस्थेला लोक गौरव पुरस्कार प्रदान.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हाप्रतिनिधी.
अमरावती.
विदर्भ महारोगी सेवा मंडळ ही केवळ एक संस्था नसून ते निस्वार्थ सेवेचे अमरावती येथील तपोवन आहे. या संस्थेच्या लोकप्रिय योजनांमध्ये अमरावती करायच्या सहकार्य समितीचे गरज असून आदर्श समाजसेवक सोमेश्वर पुसदकर लोक गौरव पुरस्काराने त्यांचा प्रारंभ झाल्याचे मत वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी व्यक्त केले. अमरावती येथील लोक फाउंडेशन नागपूरचे कृषी विकास प्रतिष्ठान आणि सोमेश्वर पुसदकर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी १ एक लाख रुपयांच्या सोमेश्वर पुसदकर लोक गौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार कुष्ठरोगण्याची सेवा करणाऱ्या तपोज संस्थेला बहाल करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते विदर्भ का राजा भीम न्यू आजाद गणेशोत्सव मंडळाच्या रांगणात हा कार्यक्रम पार पडला. नामवंत लेखक व समीक्षक डॉ. अक्षय कुमार काळे, आमदार सुलभाताई खोडके, ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे, माजी महापौर विलास इंगोले, आदी मान्यवर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष गवळी व विश्वस्तांनी हा पुरस्कार लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गांधी पुढे म्हणाले विदर्भातील संस्कृती केंद्र म्हणून अमरावती जिल्ह्याची माहिती असून या जिल्ह्याच्या वैभवला कर्तव्यत्वाचा आहे. आजवर या जिल्ह्यातील अनेक समर्थक त व्यक्तिमत्त्वांना आपल्या निस्वार्थ कर्तृत्वातून हे वैभव जअमर केले आहे. त्यामध्ये अशा कार्यक्रमामुळे अधिक भर पडत आहे. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांना जवळ करून डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी१९४६ साली तपोवन उभे केले. दाजी साहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आजही संस्था कार्यरत असून अध्यक्ष डॉ
सुभाष गवई व नियमक समिती सदस्य त्यांनी स्वार्थ सेवेतून कार्य करीत आहे. या कार्याचा गौरव म्हणून सपोर्ट संस्थेला यंदाच्या सोमेश्वर योग्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावेळी त्यांनी स्पष्ट केले. यावेळी इतर मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. गोविंद किरमनवार यांनी केले
आभार वैभव दलाल यांनी मानले. कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष दिनेश भाऊ बुब, पत्रकार विलास मराठे, पप्पांच्या नियम समितीचे सदस्य विवेक मराठे, डॉ. प्रफुल्ल कडू, ऑड. श्रीकांत खोरगडे, दिलीप दाभाडे, डॉ. शोभा रोकडे, पुष्पाताई बोंडे, महेंद्र भुतडा, डॉ गोविंद कासाट यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here