Home बुलढाणा मेरा बु….‘येथे’ छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारकाच्या बांधकामास सुरुवात; सरपंच महिलेची कौतुकास्पद कामगिरी….

मेरा बु….‘येथे’ छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारकाच्या बांधकामास सुरुवात; सरपंच महिलेची कौतुकास्पद कामगिरी….

21
0

आशाताई बच्छाव

1000614432.jpg

मेरा बु….‘येथे’ छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारकाच्या बांधकामास सुरुवात; सरपंच महिलेची कौतुकास्पद कामगिरी….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
चिखली :-बुलढाणा तालुक्यांतील मेरा बु गावामध्ये पहिल्यांदाच भव्यदिव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक साकारल्या जात असल्याने सरपंच महिलेची कौतुकास्पद कामगिरी पाहून गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
‘बाई झाली सरपंच, तिचा वाया गेला प्रपंच’
चिखली तालुक्यात ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थेत अनेक ग्रा. प.मध्ये सरपंच पदावर महिला विराजमान झालेल्या आहेत. परंतु क्वचितच महिला स्वत: ग्रा. प. चा कारभार पाहतात आणि काही महिलांचे पती सरपंच म्हणून वावरत आहेत. परंतु मेरा बु येथे ३ वर्षा पासून सरपंच पदावर विराजमान झालेल्या सौ अनिता वायाळ यांनी यावर मात करीत ‘बाई झाली सरपंच, तिचा वाया गेला प्रपंच’ – या मानसिकतेकडून ‘बाई झाली सरपंच, सुधारला गावचा प्रपंच’ असा निर्धार करूण या महिलेनं गावकऱ्यांच्या प्रत्येक विकास कामाला प्राधान्य देत कामांना सुरवात केली आणि मेरा बु गावात मुख्य ठिकाणी बस स्टॉपवर अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भोवती घाणीचे साम्राज्य होते त्यामुळे पावसाळयात पुतळ्या समोर कार्यक्रम आयोजीत करता येत नव्हते . तसेच अनेक वर्षांपासूनचा हा पुतळा असल्याने पुतळ्याच्या चबुतऱ्याला भेगा पडल्या होत्या . त्यामुळे या पुतळ्याचे नव्याने बांधकाम व्हावे अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करत असल्याने सरपंच सौ अनीता ताई वायाळ यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा. प. सदस्य यांना हा प्रकार सांगितला त्यामुळे गजानन वायाळ यांनी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे पाठपुरावा करून छत्रपती शिवाजी महाराजांचे नवीन भव्यदिव्य स्मारक मंजूर करूण आनले आणि गेल्या १५ ते २० दिवसा पासून बांधकामास सुरुवात केली आहे. हा सरपंच महिलेची कौतुकास्पद कामगिरी पाहून गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here