Home बुलढाणा गायत्री शिंगणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या… ज्येष्ठांच्या आशीर्वादाने व युवकांच्या साथीने...

गायत्री शिंगणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या… ज्येष्ठांच्या आशीर्वादाने व युवकांच्या साथीने सामान्यासाठी लढण्याचा निर्धार… गायत्री शिंगणे

34
0

आशाताई बच्छाव

1000614430.jpg

गायत्री शिंगणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या… ज्येष्ठांच्या आशीर्वादाने व युवकांच्या साथीने सामान्यासाठी लढण्याचा निर्धार… गायत्री शिंगणे
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
सिंदखेडराजा बुलढाणा :- सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी जनसामान्याच्या अनेक मागण्या मंजूर करण्यासाठी, शासन दरबारी मांडण्यासाठी, मातृ तीर्थ सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर जनसामान्याचा जनक्रांती आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढणे या प्रमुख मागणीसह इतरही अनेक मागण्या या मोर्चामध्ये मांडण्यात येणार आहेत, या जनक्रांती आक्रोश मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष सौ रेखाताई खेडेकर करणार आहेत.माजी आमदार रेखाताई खेडेकर यांच्या नेतृत्वात होत असलेल्या या मोर्चामध्ये श्री नरेश यांना, श्री प्रसेंजित पाटील अशी मातब्बर मंडळी ही उपस्थित राहणार आहे.तरी या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून एक दिवस सिंदखेडराजा मतदारसंघाच्या विकासासाठी द्यावा असे आवाहन, पक्षाच्या जिल्हा महिला कार्याध्यक्ष गायत्री गणेश शिंगणे यांनी केले आहे.
तर उद्या हा मोर्चा संपल्यानंतर सिंदखेडराजा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी,व मागण्या यावर पूर्णवेळ कार्य करण्यासाठी कु. गायत्री शिंगणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सौ रेखाताई खेडेकर यांच्या हस्ते होणार आहे.या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ज्येष्ठांचे आशीर्वाद व युवकांच्या साथीने सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये एक परिवर्तनाची नांदी घडवुन आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, तरी परिवर्तनाच्या या लढाईत आपल्या लेकीला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने मोर्चाला व उद्घाटनालाही उपस्थित रहावे अशी साद मतदारसंघातील सर्व जनतेला आपण करीत आहोत,असे गायत्री शिंगणे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here