Home बुलढाणा आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू.

आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू.

47
0

आशाताई बच्छाव

1000606281.jpg

आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे जात ज्या ठिकाणी मिटकरी बसलेले होते, त्या ठिकाणी धाव घेऊन घोषणाबाजी करून त्यांच्या गाडीची तोडफोड केली. तर, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले.
या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवरले. दरम्यान, हा सर्व घटनाक्रम होत असताना अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष जय मालोकार (२५) रा. मोठी उमरी यांना छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांच्या अंगाला दरदर घाम सुटल्यानंतर जय यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

Previous articleसिंदखेड राजा धक्कादायक ! अखेर का तोडली माँ जिजाऊंच्या जन्मस्थळावरील जुनी झाडं…
Next articleटेकेपार/माडगी येथील डांबरी रस्ता बनलाय पांदन रस्ता रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा – चिराग चेटूले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here