Home बुलढाणा बँकेवाले परेशान करत आहेत, पत्नीला कॉलवरून सांगितले अन्…. बंदुकीतून गोळी डोक्यात आरपार...

बँकेवाले परेशान करत आहेत, पत्नीला कॉलवरून सांगितले अन्…. बंदुकीतून गोळी डोक्यात आरपार शिरली, भिंतीला लागून खाली पडली !

62
0

आशाताई बच्छाव

1000603517.jpg

बँकेवाले परेशान करत आहेत, पत्नीला कॉलवरून सांगितले अन्…. बंदुकीतून गोळी डोक्यात आरपार शिरली, भिंतीला लागून खाली पडली !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-चिखलीचे आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी आज, ३१ जुलैला साडेचार सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बुलडाणा
येथील पोलीस वसाहतीत ही घटना घडली..या घटनेचा विस्तृत असा घटनाक्रम समोर आला आहे.. अजय गिरींचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि विनोदी होता, त्यामुळे एवढा टोकाचा निर्णय त्यांनी का घेतला असा प्रश्न उपस्थित होत होता.. आता आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.
अजय गिरी यांची आज सुट्टीवर होते. काल ते, आमदार श्वेताताई महाले यांच्यासोबत होते. आज त्यांच्याऐवजी श्री. राऊत हे अंगरक्षक म्हणून आमदार श्वेताताई यांच्यासोबत होते. अ सुट्टी असल्याने अजय गिरी कुटुंबासोबत होते. दुपारी ते पत्नीला घेऊन बँकेत खाते काढण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारच्या
वेळेला त्यांनी पत्नी दिपाली यांना घरगुती खरेदीसाठी पैसे दिले.. त्यामुळे घरघुती कामासाठी दिपाली या बाहेर गेल्या होत्या. काही वेळाने त्यांचे आणि पती अजय गिरी यांचे फोनवर बोलणे झाले, बँकेवाले परेशान करत आहेत, खूप टेन्शन आले आहे असे ते पत्नी दिपाली यांना फोनवर सांगत होते. त्यावेळी फोनवर बोलत बोलतच दिपाली ह्या घरी आल्या..
मी तुझ्यासाठीच थांबलो होतो…
पत्नी दिपाली घरी आल्यानंतर मी तुझ्यासाठीच थांबलो होतो असे अजय गिरी पत्नीला उद्देशून म्हणाले. त्यावेळी दिपाली यांनी पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, काळजी करू नका असे त्या पतीला म्हणत होत्या. साडेचारच्या सुमारास दोघे पती पत्नी घरातील बेडरूम मध्ये होते. त्यावेळी पिस्टल अजय गिरी यांच्याजवळच होते. अचानक अजय गिरी उठले आणि त्यांनी बंदूक डोक्याला लावली, तेवढ्यात दिपाली यांनी बंदूक हिसकण्याचा प्रयत्न केला मात्र पत्नीच्या हाताला झटका देत अजय गिरी यांना एका क्षणात फायर केले.. दुसऱ्या क्षणाला अजय गिरी रक्ताच्या थारोळ्यात होते.. पत्नी दिपाली आणि मुलगा प्रथमेश यांनी आरडाओरड केल्याने शेजारी धावत गिरी यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात
आले मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here