Home बुलढाणा आता गो-शाळेतील पशुधन कत्तलीच्या मार्गावर ! – श्रीकृष्ण गोसंवर्धन ट्रस्ट मधून 7...

आता गो-शाळेतील पशुधन कत्तलीच्या मार्गावर ! – श्रीकृष्ण गोसंवर्धन ट्रस्ट मधून 7 गायी व 1 गोरा लंपास – पिंपळनेर येथूनही एक गाय व बकरी चोरीला !

33
0

आशाताई बच्छाव

1000602154.jpg

आता गो-शाळेतील पशुधन कत्तलीच्या मार्गावर ! – श्रीकृष्ण गोसंवर्धन ट्रस्ट मधून 7 गायी व 1 गोरा लंपास – पिंपळनेर येथूनही एक गाय व बकरी चोरीला !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- गिरोली खुर्द येथील श्रीकृष्ण गोसंवर्धन ट्रस्ट मध्ये 50 लहान मोठे गाय वासरू होते. मात्र 28 जुलैला सकाळी 6 च्या सुमारास तारेचे कंपाउंड तोडून 7 गाई व एक गोरा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची बाब समोर आली आहे. या पशुधनाची 1 लाख 60 हजार रुपये अशी एकूण किंमत आहे. दरम्यान पिंपळनेर येथील एक गाय व एक बकरी चोरी गेलीअसून, या ढोरचोऱ्यांच्या मुसक्या आवळायचे आवाहन देऊळगाव राजा पोलिसांसमोर आहे.
देऊळगाव राजा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या
गीरोली खुर्द येथील श्रीकृष्ण गोसंवर्धन ट्रस्ट मधील सात गाई व एक गोरा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार भानुदास शिवाजी खंदारे यांनी दिली आहे. ते येथे 9 वर्षापासून काम करतात. 27 जुलै च्या रात्री त्यांनी गाई वासरांना ढेप चारली आणि झोपायला निघून गेले. पहाटे सकाळी उठल्यावर त्यांना तारेची कंपाउंड तुटलेले दिसून आले. त्यांनी गोशाळेत असलेल्या जनावरांची मोजणी केली असता यामध्ये 7 गायी व एक गोरा कमी आढळून आला. त्यांनी याबाबत ट्रस्टचे राजेश तायडे यांना सांगितले. दरम्यान देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. तसेच पिंपळनेर येथील प्रल्हाद टकले यांची एक गाय व राजू कांबळे यांची एक बकरी चोरीला
गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या तिघांनीही देऊळगाव राजा पोलिसांना तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे मागील काही काळापासून पशुधनाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातही दुधाळ पशुधनाच्या पन्नास हजार ते लाखांच्या घरात आहेत. त्यातच गोवंशहत्या बंदीमुळे कत्तलखान्यासाठी पशुधन मिळणे बंद झालेले आहे. त्यामुळे चोरट्यांकडून पशुधनाला लक्ष्य केले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो, पशुधन संभाळा अन्यथा चोरटे टपूनच आहेत, असे म्हणायची वेळ आली आहे. कत्तलखान्यात जनावरे, बोकडांची गरज असते. वाढलेल्या किमतीमुळे चोरट्यांकडून पशुधनाचीही चोरी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here