Home बुलढाणा थेंबे थेंबे तळे साचे..!’ – येळगाव धरण तहानलेलेच ! – केवळ 35...

थेंबे थेंबे तळे साचे..!’ – येळगाव धरण तहानलेलेच ! – केवळ 35 टक्के जलसाठा!

27
0

आशाताई बच्छाव

1000602144.jpg

‘थेंबे थेंबे तळे साचे..!’ – येळगाव धरण तहानलेलेच ! – केवळ 35 टक्के जलसाठा!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-‘थेंबे थेंबे तळे साचे..’ या म्हणी प्रमाणे बुलढाणा शहरासह सव्वा लाख व परिसरवासियांची तहान भागविणाऱ्या येळगाव धरणात आतापर्यंत 35 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने या धरणात 10 ते 12 टक्के जलसाठ्याची भर पडली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हे धरण भरल्यास नागरिकांचे पाण्याचे टेन्शन दूर होईल.
बुलडाणा शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात पाणीसाठय़ाची क्षमता 12.40 दलघमी आहे.
शहर व परिसरातील काही ग्रामीण भागात नगरपालिके द्वारे सव्वा लाख लोकसंख्येच्या वस्तीला
पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरी भागात नगरपालिकेद्वारे काही भागात जुनी पाइपलाइन तर काही भागात श्री व्हॉल्व्ह सिस्टीमद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. या जलकुंभात शहर परिसरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे पाण्याचे टेन्शन वाढले होते. मात्र गेल्या दोन-तीन दिवसापासून सारखा पाऊस रिपरीपत असल्याने सध्या धरणात 35 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. परंतु अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दमदार पाऊस पडल्यास धरण भरून पाण्याचा प्रश्न सुटू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here