Home भंडारा जुनी पेंशन योजना लागु करण्यासाठी आमदार व तहसिलदार यांना निवेदन

जुनी पेंशन योजना लागु करण्यासाठी आमदार व तहसिलदार यांना निवेदन

77
0

आशाताई बच्छाव

1000602050.jpg

जुनी पेंशन योजना लागु करण्यासाठी आमदार व तहसिलदार यांना निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त खाजगी विना अनुदानित,अंशतः अनुदानावर असलेल्या व २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना १९८२ ची जुनीच पेंशन लागू करावी यासाठी महाराष्ट्र सरकारने मा.सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक शपथपत्र ताबडतोब सादर करावे यासाठी *जुनी पेंशन संघर्ष कृती समिती साकोली तालुका* तर्फे मा.तहसीलदार साहेब साकोली आणि मा. नानाभाऊ पटोले आमदार साहेब साकोली यांचे प्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त खाजगी विना अनुदानित,अंशतः अनुदानावर असलेल्या व २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांना १९८२ ची जुनी पेंशन लागू होण्यासाठी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे.ही याचिका महाराष्ट्र शासन विरूद्ध २००५ पूर्वीचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अशी आहे.
यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात वरिष्ठ सभागृहात दि.१२जुलै २०२४ रोजी *’महाराष्ट्र शासन हे २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेंशन बाबत सकारात्मक असुन लिखित स्वरूपाचे सकारात्मक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करणार’* असल्याचे घोषित केले होते.याबाबतीत दि.१८जुलै २०२४ रोजी झालेल्या सुनावणीत सरकारी वकील आदित्य पांडे यांनी तीन आठवड्याचा कालावधी मागितला. पुढील सुनावणीस दि.७ ऑगस्ट रोजी होणार आहे.परंतु अजुनपर्यंत महाराष्ट्र शासनामार्फत कोणतीही करण्यात आली नाही.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना १९८२ ची जुनी पेंशन लागू होण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक शपथपत्र ताबडतोब सादर करावे,पेंशन पिडीतांना न्याय मिळवून द्यावे, या आशयाचे निवेदन जुनी पेंशन संघर्ष कृती समिती साकोलीच्या वतीने मा.आमदार नानाभाऊ पटोले व मा.तहसीलदार साहेब यांना देण्यात आले.
यावेळी तालुका कार्यवाह नंदकुमार क्षिरसागर, उपाध्यक्ष राजेश भालेराव,धनंजय तुमसरे,
विलास मानकर, ओमप्रकाश शिवनकर,रामचंद्र नाकाडे, हितेंद्र बोंद्रे, अनिल तुरकर,मनोहर केवट आदी जुनी पेंशन पिडीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleगरीब कुटुंबाला आर्थिक मदत. ईजी. विश्वंभर पवार
Next articleआलापल्ली महावितरण विभागीय कार्यालयातील रिक्त पदे भरा!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here