आशाताई बच्छाव
साहित्य रत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे हे एक प्रसिद्ध मराठी समाजसुधारक, लोककवी व लेखक –राजेश (राजु) कटरे
गोंदिया _संजीव भांबोरे ) साहित्य रत्न लोक शाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय एकोडी येथे साजरी करण्यात आली. दरवर्षी १ ऑगस्टला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे आहे. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे मांग जातीत झाला. जातीय भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही.
साहित्य रत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे हे एक प्रसिद्ध मराठी समाजसुधारक, लोककवी व लेखक होते. त्यांच्या लेखनात सामाजिक आणि राजकीय विषयांवर आधारित कृतिशीलता आढळते. अण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या आणि ३०० हून अधिक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांनी “फकिरा,” “वारणेचा वाघ,” आणि “चिखलातील कमळ” यांसारख्या प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिल्या. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून, त्यांचे प्रेरणादायी विचार आणि कोट्स शेअर केले जातात. उदाहरणार्थ, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे” हा त्यांचा प्रसिद्ध विचार आहे मराठीझलकचा प्रभाव आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना त्यांच्या योगदानाची आठवण ठेवणे महत्त्वाचे आहे.
*अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. हे समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते. त्यांनी अनेक कथा, कादंबरी आणि कवितांचे लिखाण केले. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. असे उपस्थित मान्यवर सामाजिक कार्यकर्ता राजेश (राजु) कटरे, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार (बंटी) पटले व माजी सरपंच रविकुमार (बंटी) पटले यांनी यावेळी सांगितले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्य रत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे व विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुण अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य घनश्याम पटले, धर्मेन्द्र कनोजे, पत्रकार आरिफ़ पठाण ,शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष, अरुणकुमार बिसेन, बालु भदाडे, बंटी रिणायत ,श्रावण पटले, हरिशंकर लांजेवार, राजु बरेकर, नितुश डुंडे, जितेंद्र लांजेवार, प्रेमलाल बरेकर, पत्रकार महेंद्र कनोजे, पुरणलाल बिसेन, यशवंत बावने, लुकेश डुंडे, विशाल कनोजे, गोलु असाठी, मोहन मराठे, गणेश बिसेन, पोर्णिमा तायवाडे, माया तायवाडे, तारा डुंडे, तारा बावने, पत्रकार व मीडिया प्रमुख राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गोंदिया तिरोडा विधानसभा क्षेत्र राजेशकुमार तायवाडे तसेच गावकरी व मोठ्या संख्याने समाज बांधव उपस्थित होते.