आशाताई बच्छाव
नाशिक प्रतिनिधी मुकुंदा चित्ते
भगुर नगरपालिकेचा भोंगळा कारभार महात्मा गांधी रोड, मारुती मंदिराजवळील संपूर्ण रस्ता फोडून काढत या रस्त्याची दुरवस्था करुन ठेवली
महात्मा गांधी रोड मारुती मंदिराचे बांधकाम सुरू असताना मंदिराजवळील संपूर्ण रस्ता हा खड्डेमय झालेला असुन याकडे भगुर नगरपालिकेने पाठ फिरवली आहे हा संपूर्ण सावळा गोंधळ नगरपालिकेत सांगितला असता नगरपालिकेतील कर्मचारी वर्ग उडवाउडवीची उत्तरे देत मंदिराचे बांधकाम झाल्यावर रस्ता करु असं खोटं आश्वासन देतात गेल्या ६ महिन्यांपासून हा रस्ता रहदारी साठी उपयुक्त नाही
महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्त्याचा आणि मंदिराचा काहीही संबंध नाही मंदिराचे बांधकाम हे संपूर्ण झालेले असुन रस्त्यावर खड्डे पडलेले आहे
याठिकाणी खड्ड्यांमध्ये पाण्याचे डबके साचले असल्याने मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव देखील जास्त झालेला आहे डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांना आमंत्रण दिलं तर यांस जबाबदार कोण ??? असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि मनसे उपशहर अध्यक्ष शाम देशमुख यांनी उपस्थित केला
याची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे उपशहर अध्यक्ष शाम देशमुख यांनी दिला.