Home अमरावती विदेशी चलनाच्या नावावर गंडविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, तीन महिला अटक,२.७९ लाखाचा मुद्देमाल...

विदेशी चलनाच्या नावावर गंडविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, तीन महिला अटक,२.७९ लाखाचा मुद्देमाल जप्त.

41
0

आशाताई बच्छाव

1000597958.jpg

विदेशी चलनाच्या नावावर गंडविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, तीन महिला अटक,२.७९ लाखाचा मुद्देमाल जप्त.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती (दर्यापूर)
अमरावती जिल्ह्यात विदेशी नोटांच्या नावावर गंडविणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा व दर्यापूर पोलिसांचा संयुक्त पथकाने, ३० जुलै रोजी पर्दाफाश केला. या टोळीतील तीन महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विदेशी नोटा, रोख व मोबाईल असा एकूण २ लाख ७९ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीतील पुरुष आरोपीचा शोध सुरू आहे. शांतामीर फिरोज मीर वय २७ गोपाल पुरी उत्तर दिल्ली, शिल्पी बेगम बुरहान शेख वय ४०रा. बेगूर, कर्नाटक व नदिया मोहम्मद इम्रान वय ३२रा.जे.जे. कॉलनी ब्लॉक, ई-बवाना, नॉर्थ वेस्ट दिल्ली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. अमरावती जिल्ह्यातीलदर्यापूर येथील रहवासी उमेश सुरेश गावंडे वय ३८ त्यांच्या मिनी बँक ऑनलाईन सेंटरवर जाऊन दोन पुरुष व एक महिने आपल्या जवळील विदेशी नोटा दाखविल्या, त्या विदेशी नोटा भारतीय चलनात बदलून देता काय, अशी विचारणा त्यांनी उमेश गावंडे यांना केली. उमेश गावंडे यांनी होकार दिल्यावर आरोपींनी त्यांच्याजवळु न ५० हजार रुपये घेतले. त्याचवेळी त्यांना एक बॅग देत त्यात विदेशी नोटा असल्याचे आरोपींनी त्यांनी सांगितले. दरम्यान, उमेश गावंडे यांनी बॅग बघितल्यावर त्यात चक्क रद्दी पेपर आढळले. आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यावर उमेश गावंडे यांनी २८ जुलै रोजी दर्यापूर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासा सदत ठकसेनांची टोळी मुर्तीजापुर येथे वास्तवास असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस पथकाने मूर्तिजापुरातील चिखली मार्गावर आरोपी भाड्याने राहत असलेल्या खोलीवर धाड टाकली. यावेळी खोलीत सदर तिन्ही आरोपी महिला आढळून आल्यास. खोलीच्या झडतीत विदेशी नोटा, २ लाख ६५ हजार २५० रोख व १० मोबाईल असा २ लाख ७९ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल आढळून आला. त्यानुसार पोलीस पथकाने मुद्देमाल जप्त करून तिन्ही महिला आरोपींना अटक केली. त्यांना पुढील कारवाईसाठी दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या टोळीतील पुरुष आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर, त्रंबक मनोहर, सुनील महात्मे, सय्यद अजमत, निलेश डोंगरे, उमेश वाकपांजर, प्रतिभा लुंगे, किरण सरदार, चेतन गुल्हाने, रितेश वानखडे यांनी केली

Previous articleशेतकऱ्यांच्या प्रश्नावर देवळा येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची सांगता
Next articleदेवळा तालुक्यात दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा घात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here