Home जालना वेतन अधिक्षकाने मागवले शिक्षण उपसंचालकाचे मार्गदर्शन ! मराठवाडा शिक्षक संघाच्या घोषणांनी परिसर...

वेतन अधिक्षकाने मागवले शिक्षण उपसंचालकाचे मार्गदर्शन ! मराठवाडा शिक्षक संघाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला !

28
0

आशाताई बच्छाव

1000597735.jpg

वेतन अधिक्षकाने मागवले शिक्षण उपसंचालकाचे मार्गदर्शन ! मराठवाडा शिक्षक संघाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला !
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक ३०/०७/२०२४
याविषयी सविस्तर माहिती अशी की,मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने वेतन अधिक्षक कार्यालय जालना यांच्या कार्यालयासमोर १नोव्हेंबर २००५ पूर्वी व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या त्याचप्रमाणे १नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे थकीत १ते ५ हप्ते त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावे त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते नसेल अशा कर्मचाऱ्यांचे नव्याने खाते उघडून त्यामध्ये थकीत हफ्ते जमा करावे आणि ज्या कर्मचाऱ्यांचे डीसीपीएस किंवा एनपीएस असे कोणतेच खाते नाही अशा कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करावे आणि सन 2021 पासून च्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या लवकरात लवकर मिळाव्या यासाठी तीव्र लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले होते आंदोलन स्थळी बाबासाहेब बिडवे,प्रा पैठने,विजयकुमार म्हस्के, उगले यांनी आपल्या समस्या मांडल्या तर जिल्हा उपाध्यक्ष जगन वाघमोडे कार्याध्यक्ष एफ एस सय्यद जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे व मार्गदर्शक प्रा डॉ मारुती तेगमपुरे यांनी आंदोलन कर्त्यांना संबोधित केले त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी यांनी वेतन अधिक्षक मकरंद सेवलीकर यांच्याशी चर्चा केली यामध्ये अधीक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवून येत्या दोन ऑगस्ट पर्यंत प्रश्न निकाली काढतो असे लेखी पत्र दिले .आंदोलनामधे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्य अन्यायग्रस्त, शोषित, वंचित ,पीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मराठवाडा शिक्षक संघाचे बहाद्दर शिलेदार सहभागी झाले होते.जिल्ह्यातील अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी शासनाचा कोणताही लेखी आदेश नसताना सुद्धा शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांचे भविष्य निर्वाह खाते असूनही डीसीपीएस किंवा एनपीएस खाते उघडण्यासाठी त्यांच्यावर दडपण आणून चालू खाते बंद केल्याचे प्रकार जिल्ह्यातील अनेक शाळेमध्ये घडलेली आहेत याचीही दखल घेण्याची मागणी यावेळेस आंदोलनकर्त्यांनी वेतन पथक अधीक्षक जालना यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here