आशाताई बच्छाव
भाईका जामीन कराना है, म्हणून मागितली 25 हजार रुपये खंडणी
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- मेरे भाईका जामीन कराना है,मुझै अभि 25 हजार रूपये दो.नही तो देखो फिर मै क्या करता अशी धमकी देत खंडणी मागितल्याचा प्रकार चाळीसगाव शहरातील नागद रस्त्यावर घडला असून याप्रकरणी देाघांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सद्दाम जाकीर उर्फ दिलावर मेंबरखान या तरुणाने ही फिर्याद दिली आहे. दि.15 रोजी सद्दाम हा त्याच्या भंगार दुकानावर बसलेला असतांना माया उर्फ शोएब अस्लम शेख हा दुकानात आला व न विचारता पाईप घेऊन जावू लागला.
सद्दामने पैशाची मागणी केली असता तू मुझे पहेचानता नही क्या, मै कोन है?
तो धंदा करना नही क्या असे म्हणत अशी शिवीगाळ करीत भंगार विक्रीसाठी आलेल्या लोटगाडयांची फेकाफेक केली. यावेळी सद्दामचा आतेभाऊ व मित्र शोएब यास समजावण्यास गेले असता त्याने त्यांच्याकडे भावाच्या जामीनासाठी 25 हजारांची मागणी केली.
शोएब काहीतरी बरे वाईट करून टाकेल म्हणून सद्दामच्या आतेभावाने त्यास 25 हजार रूपये दिले. त्यानंतर शोएब 27 रोजी पुन्हा दुकानावर आला व धंदा करायचा असेल तर 10 हजार रूपये दरमहा द्यावे लागतील नाहीतर गोळी घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
तर दि.30 रोजी दानिश शेख असलम याने तू कशी तक्रार करतो मग पहा काय होते अशी धमकी देत दस हजार रूपये का इंतजाम करके रखना, नही तो जिंदा नही रहोंगे अशी धमकी देवून खंडणीची मागणी केली.
या प्रकरणी सद्दाम जाकीर उर्फ दिलावरमेंबर खान याने दिलेल्या फिर्यादीवरून माया उर्फ शोएब अस्लम शेख व दानिश शेख अस्लम या दोघांच्या विरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता 308(2), 308(3), 308(4), 308(5),324(4),351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.