आशाताई बच्छाव
पारध पोलिसांची अवघडराव सावंगी येथे अवैध गावठी हातभट्टी दारू विक्रेत्या वर छापा.
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके दिनांक..18/07/2024.. सविस्तर वृत्त असे की,पारध पोलीस ठाण्याचे स.पो.नी. चैनसिंग घुसिंगे यांना माहिती मिळाली की, इसम नामे गुलाब किसन शिंदे राहणार अवघडराव सावंगी तालुका भोकरदन हा अवैध रित्या गावरान हातभट्टी दारू विक्री करत आहे. अशी माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी स्टाफ सह जाऊन छापा मारला. असता गुलाबराव किसन शिंदे यांच्या घरात एक निळ्या रंगाचा प्लास्टिकचा ड्रम व त्यामध्ये 40 लिटर आंबट उग्र वास दारूचे मिश्रण एका प्लास्टिकच्या बकेटमध्ये वीस लिटर गावठी दारूचे मिश्रण चार प्लास्टिकच्या कॅन मध्ये 60 लिटर गावठी दारूचे मिश्रण असा एकूण सतरा हजार पाचशे गावठी हातभट्टीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी गुलाब किसन शिंदे राहणार अवघडराव सावंगी तालुका भोकरदन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई स.पो.नी चेनसिंग घुसिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि नेमाने प्रकाश शिनकर, जीवन भालके ,संतोष जाधव यांनी केली आहे.