Home जालना व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लुट व छळ,मिरचीचे भाव माती मोल शेतकऱ्यांची फसवणूक

व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लुट व छळ,मिरचीचे भाव माती मोल शेतकऱ्यांची फसवणूक

111
0

आशाताई बच्छाव

1000559226.jpg

व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लुट व छळ,मिरचीचे भाव माती मोल शेतकऱ्यांची फसवणूक
जाफराबाद तालुका प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
दिनांक १८/०७/२०२४
याविषयी सविस्तर वृत्त असे की,व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची दिवसेंदिवस लट वाढतच असून व्यापाऱ्यांनी मिरची मालाचे दर पाडले असुन मिरची उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे.याविषयी सविस्तर असे की,जाफराबाद येथे मिरची खरेदी करण्यासाठी व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात आणि शेतकऱ्यांची मिरची खरेदी करतात.जाफराबाद येथील मिरची मार्केटमध्ये शेतकऱ्यांची अतोनात लूट चालली असून त्यांचा छळ करण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती घेतली असता असे निदर्शनास आले की, जर मिरची खरेदी करतांना ४००० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे दर ठरला तरी व्यापारी शेतकऱ्यांना ३८०० रुपये प्रती क्विंटल ने पैसे देतात.एखादा शेतकरी सदर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांला विचारणा करण्यासाठी गेल्यास त्याला तुझा माल उचलून परत घेऊन जा अशा प्रकारे धमक्या दिल्या जातात.व शेतकऱ्यांसोबत अरेरावीची भाषा वापरली जाते.दुसरे असे की, जर एखाद्या शेतकऱ्याची करू १० हजार रुपये असेल तर त्यांना मार्केट कमिटीचा बटाव या शब्दाच्या नावाखाली ५०० ते ८०० रुपयांची लूट केली जाते. एक पोते ५५ .९० कीलो वजन भरले तर,ते ५३ किलो धरले जाते म्हणजे शेतकऱ्यांचे जवळ पास ३ कोलो मिरची कमी केली जाते.हा फटका शेतकऱ्यांना बसतो याकडे कृषी उत्पन्न बाजार पण बाजार समितीचे अधिकारी किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हे जानिवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत.व्यापाऱ्यांच्या काळ्या बाजाराकडे लक्ष देत नाही व्यापाऱ्यांचा हम करे सो कायदा या म्हणीप्रमाणे चालले आहे.व्यापारी शेतकऱ्यांचा अतोनात छळ करीत आहेत .आमचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना भेटले असता त्यांनी सांगितले की, हे सर्व अधिकारी भ्रष्ट आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हेव्यापाऱ्याकडून आपली चिरीमिरी घेऊन जातात आणि व्यापाऱ्यांना मोकाट सोडतात. जेणेकरून शेतकऱ्यांचे ,हाल -अपेष्टा होत आहे. जाफराबाद तालुक्यांमध्ये जवळपास 102 गावे असून त्या सर्व गावांचे केंद्रबिंदू म्हणजेच जाफराबाद येत आहे . याकडे कोणी लक्ष देईल का? शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही अशी भावना शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. कोणी आपली दखल घेऊन आपल्या मालाला भाव देईल का ? कि अशीच लूट होत राहील? आपला या जगामध्ये कोणी वाली आहे का? सरकार मायबापांनी शेतकऱ्याकडे लक्ष देऊन जगाचा पोशिंदा कोणी वाचवेल का? त्यांना जिवंत ठेवेल का? असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत आहेत.

Previous articleअमरावती जिल्ह्यातील विदर्भाचे पंढरपूर कौन्दन्य पुरात हजारावर भाविकांची मांदियाळी, दात्यांकडून भाविकांना फराळाचे वितरण.
Next articleवृक्षारोपणाची चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे – आमदार कानडे*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here