Home अमरावती संस्कार इंटरनॅशनल स्कूल शिरजगाव कसबा तर्फे वारकरी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन...

संस्कार इंटरनॅशनल स्कूल शिरजगाव कसबा तर्फे वारकरी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन –

165
0

आशाताई बच्छाव

1000556189.jpg

संस्कार इंटरनॅशनल स्कूल शिरजगाव कसबा तर्फे वारकरी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन – मयुर खापरे चांदुर बाजार प्रतिनिधी . .
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी व मेधा नदीच्या काठावर वसलेल्या तसेच संस्कृतीची देण असलेल्या शिरसगाव कसबा नगरीत आज आषाढी एकादशीनिमित्त संस्कार इंटरनॅशनल स्कूल शिरजगाव कसबा तर्फे वारकरी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
संस्कृती व संस्काराची जोपासणा करत आषाढी एकादशीचे औचित्य साधून संस्कार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा निमकर यांनी शाळेतर्फे वारकरी दिंडी व पालखीच्या सोहळ्याचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या शाळे तर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सर्व गुणसंपन्न बनविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.
संस्कार इंटरनॅशनल स्कूल त्यांचा शैक्षणिक उच्च प्रतीचा दर्जा कायम ठेवून विविध उपक्रम राबवत असल्याने तेथील विद्यार्थी आवडीने ज्ञान संपादन करून नावलौकिक मिळवतात.
वारकरी दिंडी व पालखीचा सोहळा पाहून गावातील नागरिकांना ते पंढरपुरात असल्याचा भास झाला. वारकरी दिंडी व पालखी सोहळ्याच्या टाळ मृदंगाच्या नादामध्ये गावात संपूर्ण भक्तीमय वातावरण तयार झालेले आहे. वारकरी दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग व ढोलकी वाजून विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेतले.
गावकऱ्यांनी वारकरी दिंडी मधील विठ्ठल रुक्माई चे पूजन करून साक्षात दर्शनाचा लाभ घेतला. सदर सोहळा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी खूप गर्दी केली होती. साक्षात पांडुरंग शिरजगाव कसबा नगरीत अवतरल्याची अनुभूती करून नागरिकांनी साष्टांग नमस्कार केला. या सोहळ्यात शाळेतील बालगोपाल उत्साहाने सहभागी झाल्याने गावात पंढरी अवतरल्याचे दिसून येत होते. पालखीमध्ये भगवे झेंडे घेऊन निघालेल्या पायदळ वारकरी विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, हरी विठ्ठल नामाच्या गजराने परिसर दणाणून सोडला. वारकरी दिंडी व पालखी सोहळ्याचे यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा निमकर व शिक्षक वृंद- वर्षा लाडोळे, नम्रता कांडलकर, शुभांगी लाड, दिपाली चोरपगार, माधुरी बेहेरे, समीक्षा गाडगे, आचल सोनार, रेशमा टाकरखेडे, शेवंती सुने, आरती केदार, हर्षा निमकर, श्रद्धा निमकर तसेच कर्मचारी वृंद – छायाताई होले, कल्पना दाभाडे, शंकरराव पायघन व लक्ष्मी सावरकर यांनी मदत केली.

Previous articleवडलापेठा येथील २५० एकर जागा केवळ ना.धर्मरावबाबा आत्राम यांची एकट्याची नाहीत..!
Next articleभेल प्रकल्प सुरू करण्यात यावा याकरिता 9 जुलैपासून साखळी पासून सुरू – प्रशासनाचे दुर्लक्ष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here