Home गडचिरोली वडलापेठा येथील २५० एकर जागा केवळ ना.धर्मरावबाबा आत्राम यांची एकट्याची नाहीत..!

वडलापेठा येथील २५० एकर जागा केवळ ना.धर्मरावबाबा आत्राम यांची एकट्याची नाहीत..!

37
0

आशाताई बच्छाव

1000556187.jpg

वडलापेठा येथील २५० एकर जागा केवळ ना.धर्मरावबाबा आत्राम यांची एकट्याची नाहीत..!

आपलीच जागा असल्याचा केवळ कांगावा..कंपनीला जागा दान नव्हे लीजवरच !

ना.आत्राम व इस्पात कंपनी बेरोजगारांची दिशाभूल करीत असल्याचे कंकडालवार यांचे गंभीर आरोप

अहेरी/गडचिरोली ,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- तालुक्यातील वडलापेठा येथील आपल्या मालकीची जागा सुरजागड इस्पात प्रा.लि.करिता २५० एकर दान केल्याचा दावा कॅबिनेट मंत्री,विद्यमान आमदार धर्मरावबाब आत्राम यांनी केला आहे.मात्र सदरहू जागा ही केवळ त्यांची एकट्याची नसून यात इतर नागरिकांची सुध्दा जमीन आहे.तसेच ही जागा वनविभाग व महसूल विभागाची सुध्दा आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी एका कंपनीची भूमिपूजन करून बेरोजगारांना रोजगाराचे लॉलीपॉप देत अख्य जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कॅबिनेटमंत्री धर्मराव आत्राम करीत असल्याचे गंभीर आरोप काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिध्दीपत्रकातून केली आहे.

वडलापेठा येथे बुधवार १७ जुलै रोजी सुरजागड इस्पात प्रा.लि.च भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री,उद्योगमंत्री तसेच इतर मंत्र्यांच्या उपस्थिती पार पडणार आहे.मात्र यात २५० एकर जागा आपण इस्पात कंपनी उभारण्यासाठी दान देत असल्याची बातमी ना.अत्राम यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.मात्र ही जागा केवळ त्यांचीच नसून यात इतर नागरिकांसह महसूल विभाग व वनविभागाची सुध्दा जागा अतिक्रमण करून हस्तगत केली आहे.या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पर्यावरण विषयक जनसुनावणी न घेताच नियमबाहयरित्या कामे सुरू केली आहे.या 250 हेकर जमीनी मध्ये काही अतिक्रमण,वनविभागाची त्या नंतर महसूल विभागाची सुद्धा जागा असून या जागेवरील मोठमोठ्या झाडांची वृक्षतोड करून जागा बेकायदेशररित्या आपल्या ताब्यात घेतल्याचे आरोप सुध्दा त्यांनी केली आहे.

सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून ना.आत्राम यांनी सत्तेचा दुरुपयोग करून सरकारी जमीन आपल्या ताब्यात घेतल्याबद्दल या जमिनीबाबत निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच यापूर्वी या क्षेत्रात अनेक वेळा रोजगार मेळावे घेण्यात आले होते.मात्र या मेळाव्यामधून सुशिक्षित तरुण – तरुणींना कोणत्याही प्रकारची कायमस्वरुपी रोजगार मिळालेली नाही.आल्लापल्ली येथे ना.आत्राम यांनी आयोजित केलेली रोजगार मेळावा ही निव्वळ धूळफेक असून फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांसाठीच रोजगार मेळावा आयोजित केल्याचे आरोप सुध्दा कंकडलवार यांनी केली आहे.

वडलापेठा येथे कंपनीला दान केलेली ही जागा नियमानुसार नसून या जागेवर असलेल्या झाडांना अवैद्यपणे तोडन्यात आले असून अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर प्रशासन व सरकार यांची दाखल घेऊन व चौकशी करून फौजदार गुन्हा दाखल करण्यात यावी अन्यथा प्रशासन व सरकारच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याची इशारा देखील माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी प्रसिद्धीपत्रकातुन दिलेली आहे.

Previous articleजयश्रीताई पोहचल्या थेट शेतकऱ्याच्या बांधावर
Next articleसंस्कार इंटरनॅशनल स्कूल शिरजगाव कसबा तर्फे वारकरी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन –
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here