Home गडचिरोली जयश्रीताई पोहचल्या थेट शेतकऱ्याच्या बांधावर

जयश्रीताई पोहचल्या थेट शेतकऱ्याच्या बांधावर

59
0

आशाताई बच्छाव

1000555608.jpg

 

जयश्रीताई पोहचल्या थेट शेतकऱ्याच्या बांधावर

चामोर्शी/गडचिरोली ,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- मागिल दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून धान रोवणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या आणि गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार जयश्रीताई जराते यांनी आज चामोर्शी तालुक्यातील फराडा, मोहुर्ली, घारगाव, कळमगाव, सगणापूर, भेंडाळा अशा विविध गावांना भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला आणि शेती, रोवणे आणि विविध समस्यांबाबत विचारपूस केली.

दरम्यान जयश्रीताई जराते यांनी भेंडाळा येथील शेतकरी शंकर सातपुते यांच्या शेतात सुरू असलेल्या रोवण्याला भेट देऊन पाहणी केली व तेथील महिलांशी संवाद साधला. यादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, चामोर्शी तालुक्यात चिचडोह हा मोठा सिंचन प्रकल्प असतांनाही मागील दहा वर्षात सत्ताधारी नेत्यांनी भेंडाळा परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध करून देवू शकले नसून शेतकरी कामगार पक्षानेच यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

उल्लेखनीय कि, चिचडोह बॅरेजचे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी एका नेत्याने सावली तालुक्यात पळविले होते. शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते व जयश्रीताई जराते यांनी सातत्याने पाठपुरावा करून २२०० हेक्टर चे पाणी चामोर्शी तालुक्यातील शेतीसाठी पुन्हा मिळविले. मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधी हे पाणी भेंडाळा परिसरात पोहचविण्यात अपयशी ठरले आहेत. या परिसरातील जनता शेतकरी कामगार पक्षासोबत ठाम पणाने पाठिशी राहिल्यास आपण पाण्याचा प्रश्न नक्कीच सोडवू अशी प्रतिक्रिया यावेळी जयश्रीताई जराते यांनी दिली.

Previous articleरहिमपूर मुजामपेठ परिसरात अनोळखी व्यक्तीचा खून
Next articleवडलापेठा येथील २५० एकर जागा केवळ ना.धर्मरावबाबा आत्राम यांची एकट्याची नाहीत..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here