Home नांदेड रहिमपूर मुजामपेठ परिसरात अनोळखी व्यक्तीचा खून

रहिमपूर मुजामपेठ परिसरात अनोळखी व्यक्तीचा खून

35
0

आशाताई बच्छाव

1000555600.jpg

रहिमपूर मुजामपेठ परिसरात अनोळखी व्यक्तीचा खून

नांदेड,(शिवाजी धुमाळे विशेष प्रतिनिधी)-आषाढी एकादशीची पहाट उजाडताच रहिमपुर, मुजामपेठ भागात 25 -30 वर्ष वयाच्या एका युवकाच्या शरिरावर अनेक घाव घालून त्याचा जिव घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. अद्याप वृत्तलिहिपर्यंत मरणारा कोण आणि मारेकरी कोणी याचा पत्ता लागलेला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आणि इतर अनेक अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी पहाणी केली.
रहिमपुर, मुजामपेठ या भागात जास्त करून कामगार मंडळी राहतात आणि या कामागारांमध्ये सुध्दा आता मोठी स्पर्धा लागली आहे आणि त्यातूनच या ठिकाणी नेहमी वाद होत असतात. दोन तीन वर्षापुर्वी सुध्दा एका जमावाने एका युवकाचा खून केला होता. आज आषाढी एकादशीचा सुर्योदय उगवताच रहिमपुर, मुजामपेठ भागात एक अनोळखी 25-30 वर्ष वयाच्या युवकाचे प्रेत सापडले. या युवकावर शरिराच्या अनेक ठिकाणावर जखमा केल्याचे चिन्ह दिसत आहेत. आता वृत्तलिहिपर्यंत या मरण पावणाऱ्या युवकाची ओळख पटली नाही. छायाचित्रात दिसणारा युवक कोणाच्या ओळखीचा असेल तर त्यांनी या बाबतची माहिती नांदेड ग्रामीण पोलीसांना द्यावी. जेणे करून या अनोळखी मयताची ओळख पटेल आणि त्याचा खून करणाऱ्या गुन्हेगारांना पकडणे सहज होईल असे आवाहन करण्यात आले.

Previous articleरहिमपूर मुजामपेठ परिसरात अनोळखी व्यक्तीचा खून
Next articleजयश्रीताई पोहचल्या थेट शेतकऱ्याच्या बांधावर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here