Home नांदेड मोडकळीस आलेल्या देगलुर येथील महावितरण कार्यालयाचे बांधकाम करा-धनाजी जोशी.

मोडकळीस आलेल्या देगलुर येथील महावितरण कार्यालयाचे बांधकाम करा-धनाजी जोशी.

75
0

आशाताई बच्छाव

1000555533.jpg

मोडकळीस आलेल्या देगलुर येथील महावितरण कार्यालयाचे बांधकाम करा-धनाजी जोशी.

देगलूर तालुका प्रतिनिधी /गजानन शिंदे

देगलूर येथील म.रा.रा.वि.वि.कंपनी येथील अर्बन ऑफिस ग्रामीण ऑफिस सब डिव्हिजन फिल्टर ऑफिस ची इमारत मडकळी झाली असून कर्मचारी व ग्राहकांच्या जीवितहानी टाळण्यासाठी यांचे नवीन बांधकाम करणे बाबत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कडे व उर्जामंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या कडे राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी लेखी तक्रार केली .
देगलूर येथील म.रा.रा.वि.वि.कंपनी देगलूर शाखेच्या मोडकळीस आलेल्या अर्बन ऑफिस, ग्रामीण ऑफिस, सब डिव्हिजन ,फिल्टर ऑफिस ,हे मोडकळीस आले असून कर्मचारी व ग्राहक यांचे जीव धोक्यात कधीही येऊ शकतो ही इमारत कधीही बसू शकते आता सध्या पावसाळ्याचे दिवस असून पूर्ण पाणी ऑफिसमध्ये गळत आहे वरून पूर्ण स्लॅप हा कोसळण्याच्या मार्गावर आहे तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्ण पणे झुडपी झाले असून त्या ठिकाणी सापाचे प्रमाण खूप वाढले आहे ते सापे कधीही कर्मचाऱ्यांना चावा घेऊ शकतात व दुर्दैवी कोणाचाही मृत्यू होऊ शकतो तसेच कर्मचारीत ऑफिसमध्ये बसतेवेळी छतावरून त्यांच्या अंगावर पाणी थेंब थेंब सांडत आहे त्या ठिकाणी तात्काळ बांधकाम करणे गरजेचे असून आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन इमारतीच बांधकाम तात्काळ करण्यात यावे याकरितां महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्याकडे लेखी तक्रार राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन ची मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी केली …‌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here