Home बुलढाणा खासदाराच्या जिल्ह्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्राथमिक उपचार करणारे कर्मचारीच गैरहजर, कंत्राटी (कॉन्ट्रॅक्ट...

खासदाराच्या जिल्ह्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्राथमिक उपचार करणारे कर्मचारीच गैरहजर, कंत्राटी (कॉन्ट्रॅक्ट बेस वर) लागलेल्या शारदा इंगळेंनी केली अपघात झालेल्या व्यक्तीची मलमपट्टी, एवढा मोठा दवाखाना फक्त एकट्याच महिलेच्या भरोशावर …

30
0

आशाताई बच्छाव

1000553030.jpg

खासदाराच्या जिल्ह्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्राथमिक उपचार करणारे कर्मचारीच गैरहजर, कंत्राटी (कॉन्ट्रॅक्ट बेस वर) लागलेल्या शारदा इंगळेंनी केली अपघात झालेल्या व्यक्तीची मलमपट्टी, एवढा मोठा दवाखाना फक्त एकट्याच महिलेच्या भरोशावर …
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा संजय पन्हाळकर ब्युरो चीफ
बुलढाणा :- तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर बुलढाणा ते खामगाव रोडचे खोदकाम काम चालू आहे. पिंपरखेड फाट्यापासून अवघ्या काही अंतरावर ६:३० वाजेच्या दरम्यान दुचाकीचा अपघात झाला.अपघात झालेल्या व्यक्तीचे जागेवर रक्तस्त्राव होऊन अर्धा तास झाल्यावरही अपघातग्रस्त दिनेश जाधवला कोणी उचलायलाही तयार नव्हते, पण बुलढाण्यावरून डोंगर खंडाळ्याकडे जाणाऱ्या नागरिकांनी त्या व्यक्तीची विचारपूस केल्यानंतर तो बोरखेड येथील दिनेश जाधव निघाला त्याच्या घरी फोनवरून माहिती दिली नंतर दिनेशला उचलून वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मध्ये पोचविले पण तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र मधील शासकीय कर्मचारी हजर नव्हते. १० ते १२ कर्मचारी असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधील फक्त कंत्राटी (कॉन्ट्रॅक्ट बेस वर) लागलेल्या शारदा इंगळे यांनी दिनेश जाधवची मलम पट्टी करून इंजेक्शन दिले,
गावातील नागरिकांनी दिनेश जाधवला उचलून दवाखान्या मधील पलंगावर झोपविले त्यानंतर शारदा इंगळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की १०८ ला फोन केलेला आहे.नतर १०८ मध्ये अपघात झालेला रुग्णाला बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले.
अपघात झालेल्या व्यक्तीला वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मध्ये आणल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये चांगली धावपळ पाहायला मिळाली जे कधी हजर न राहणारे कर्मचारी अपघात झालेला व्यक्तीला दवाखान्यात आल्यावर रात्री ८ ते ८:३० वाजेच्या नंतर हजर झाले सध्या खासदाराच्या जिल्ह्यातच बुलडाण्यापासून जवळच असलेले वरवंड ११ किलोमीटर अंतरावर जर अशी अवस्था असेल तर बुलढाणा जिल्ह्यात मध्ये काय अवस्था असेल ही यावरून दिसत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये कोण केव्हा आजारी पडेल किंवा अपघात केव्हा होईल सांगता येत नाही त्यामुळे दवाखान्यात मध्ये २४ तास कर्मचारी हजर राहणे हे बंधनकारक पाहिजेत. तसेच शासनाने दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना लाखो रुपये खर्च करून निवासस्थाने बांधण्यात आलेली आहेत पण आज ती निवासस्थानेही धुळखात पडलेले दिसत आहे. वरवंड येथील नागरिकांनी कर्मचारी हजर राहत नसल्यामुळे वारंवार तक्रारीही केल्या पण तोडगा निघत नसल्यामुळे व रुग्णांना वेळोवेळी दवाखान्यात आल्यानंतरही उपचार मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आ

Previous articleदलालांना आवरा अन्यथा शिवसेना स्टाईलने धडा शिकवणार,चिखली तालुका शिवसेनेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन
Next articleलोणार शहर झाले घाणीचे साम्राज्य… शहरवासीयांची सोशलमिडीयाच्या माध्यमातून नाराजी…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here