Home भंडारा शेतात काम करताना वीज पडून किंवा साप चावून मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींना 25...

शेतात काम करताना वीज पडून किंवा साप चावून मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींना 25 लाख रुपये मदत द्यावी मुख्यमंत्र्यांना निवेदन

35
0

आशाताई बच्छाव

1000553015.jpg

शेतात काम करताना वीज पडून किंवा साप चावून मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींना 25 लाख रुपये मदत द्यावी मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

संजीव भांबोरे
भंडारा,( जिल्हा प्रतिनिधी)अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडारा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांना निवेदन पाठविण्यात आले की साप हा वन्य प्राणी असून या प्राण्यास मारल्यास कायदेशीर गुन्हा दाखल होतो .भंडारा जिल्हा हा भाताचा जिल्हा असून विषारी आणि बिनविषारी साप मोठ्या प्रमाणात आढळतात ते ओळखता येत नसल्यामुळे दरवर्षी शेतात काम करणाऱ्या शेतमजुराचा तसेच शेतमालकाचा सापाच्या दंसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतमजुरांची मृत्यू होतात.मात्र त्यांच्या कुटुंबांना कोणती आर्थिक मदत मिळत नाही. मात्र वाघाच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तींना व मृत्यू झालेल्या व्यक्तींना शासनाकडून 25 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्याचप्रमाणे शेतात काम करताना साप चावून मृत्यू झालेल्या व्यक्तीला तसेच शेतात काम करीत असताना अंगावर विज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना शासनाने 25 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी . आणि जखमी झालेल्या व्यक्तींना 15 लाख रुपये आर्थिक मदत करावी. दरवर्षी रानडुकराच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी होऊन आपले प्राण गंमवीत आहेत. त्यांना सुद्धा शासनाकडून काहीच आर्थिक मदत मिळत नाही. तसेच रानडुक्कर हे शेतातील उभ्या शेतमालाचे नुकसान करतात शेतातले पीक नसताना भूत करतात परंतु शेतकऱ्यांना काही मिळत नाही. म्हणून ज्यांच्या शेतातील शेतमालाचे रानडुकराने नुकसान केले त्या शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्टरी दोन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. अशा मागणीचे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, पुरुषोत्तम गायधने, नितेश बोरकर, चंद्रशेखर खोब्रागडे ,दशरथ शहारे, आदेश खगार, प्रज्वल राकडे ,लक्ष्मण गायधने, यांनी दिले आहे. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleदीड हजाराच्या ओवाळनीसाठी, लाडकी बहीण योजनेसाठी सव्वा लाख, लाडकीबहिणीचे आले अर्ज.
Next articleरायगड : 501 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here