Home अमरावती दीड हजाराच्या ओवाळनीसाठी, लाडकी बहीण योजनेसाठी सव्वा लाख, लाडकीबहिणीचे आले अर्ज.

दीड हजाराच्या ओवाळनीसाठी, लाडकी बहीण योजनेसाठी सव्वा लाख, लाडकीबहिणीचे आले अर्ज.

29
0

आशाताई बच्छाव

1000553013.jpg

दीड हजाराच्या ओवाळनीसाठी, लाडकी बहीण योजनेसाठी सव्वा लाख, लाडकीबहिणीचे आले अर्ज.

पी .एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला गेल्या पंधरा दिवसात मंगळवार, १६ जुलै पर्यंत पर्यंत१लाख२४हजार३६७ महिलांनी अर्ज केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ऑफलाइन पद्धतीने ७३ हजार ७९५ अर्ज , तर ऑनलाइन पद्धतीने ५० हजार ५७२ असे एकूण १ लाख २४ हजार ३६७ अर्ज प्राप्त झाले आहे. या योजनेमध्ये सध्या ऑफलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. प्रत्येक शनिवारी सर्व नोंद झालेल्या लाभार्थ्याच्या नावातून चावडी वाचन करून आक्षेप आल्यास पात्र, अपात्रतेबाबत गाव पातळीवरच खातर जमा करून तालुकास्तरावर समितीने अंतिम मान्यता देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मार्फत जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. अर्ज घेण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मोहीम स्वरूपात योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिबिराचे आयोजन करण्याबाबत महिला व बालकल्याण विभागाने नियोजन केले आहे, गावातील अथवा त्या त्या वार्डमधील सर्व पात्र लाभार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने हार्ड कॉफी अर्ज अंगणवाडी सेविकाकडे जमा करण्यात येत आहे. अर्जाची नोंद अंगणवाडी स्तरावर घेण्यात येत असून, त्याबाबतच्या नोंदी ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही मिळून आलेल्या अर्ज नोंदवहीत ठेवण्यात येत आहे. गावातील प्राप्ती झालेले सर्व ऑफलाइन अर्जाचे ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरण्याकरता ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तसेच सेतू सुविधा केंद्रातील डाटा ऑपरेटर यांच्यामध्ये वाटप करण्यात येऊन ऑनलाईन फॉर्म भरण्याची कारवाई करण्यात येत आहे.बेबवेस्ड आपलिकेशन बोर्डाचा एक लवकर प्राप्त झाल्यास कामात सुसूत्र ता व अधिक गतिमान कामकाज होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांच्या मार्गदर्शनात महिला बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ डा. कैलास घोडके यांच्या नेतृत्वात कामकाज केले जात आहे. अमरावती १०२३०, भातकुली ८३८६, अचलपूर ८७४७, अंजनगाव सुर्जी ५१२२, दर्यापूर ५५२६, चांदूरबाजार ७४५२, मोर्शी ६८८२, वरुड ४८७७, तिवसा ८१८६, चांदुर रेल्वे ५५९७, धामणगाव रेल्वे५५९६, धारणी ९४२५, चिखलदरा ६१५८, अमरावती महापालिका क्षेत्र २०७१७.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here