Home जळगाव आषाढी एकादशीचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स चा उपक्रम…

आषाढी एकादशीचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स चा उपक्रम…

24
0

आशाताई बच्छाव

1000553008.jpg

आषाढी एकादशीचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स चा उपक्रम…

योग्य वयातच मुलांना सुसंस्कारित करण्यासाठी आणि आपला वसा जपण्यासाठी कलंत्री विद्यालयाचा पुढाकार …

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- दि 16 जुलै रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स व कलंत्री विद्यालय च्या संयुक्त विद्यमाने दिंडी पर्यावरणाची, शिक्षणाची व सहिष्णूतेची अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
सकाळी 9 वाजता RTO कार्यालय फुले कॉलनी येथे psi नूतन झांबरे व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी चे संचालक तसेच रोटरी क्लब ऑफ चालीसगाव रॉयल्स चे सभासद आणि कलंत्री विद्यालयाचे शिक्षक वृंद ह्यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. व मान्यवरांच्या हस्ते भारतीय प्रजातीचे सुमारे 150 झाडांचे वाटप करण्यात आले.
दिंडीस पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार सुधीर तांबे उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी रोटरी चे AG डॉ संदीप देशमुख यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला ह्याप्रसंगी कलंत्री विदयालयातील विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्सतर्फे प्ले झोन ( क्रीडासंकुल) बनवून देण्यात येईल असे जाहीर केले.
तसेच रोटरी चे अध्यक्ष डॉ स्वप्निल शिंदे, प्रा. संजय घोडे, प्रा. सुनील निकम, बबन पवार, प्रमोद दायमा यांनी मनोगत व्यक्त केले. मानद सचिव संदीप चव्हाण यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख रोटे भरत दायमा, सह. प्रकल्प प्रमुख नीरज कोतकर, रोटे हर्षद ढाके, रोटे दिलीप पवार, रोटे ऋषभ सुराणा,रोटे मधुकर कासार,रोटे योगेश राजधर पाटील ,रोटे कासार मॅम, रोटे डॉ अंजली शिंदे रोटे,कविता चव्हाण, रोटे डॉ विरजा देशमुख, रोटे डॉ प्रियांका खेडकर तसेच कलंत्री विद्यालयाचे शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आरटीओ ऑफिस स्टाफ, विठ्ठल मंदिर चे ट्रस्ट सभासद ह्या सर्वांनी सहकार्य केले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here