Home बुलढाणा मेहकर तालुक्याचे संदिप गवई ‘ठरणार अनेकांची डोकेदुखी! सामान्य कार्यकर्त्याच्या उमेदवारीची चर्चाच लय...

मेहकर तालुक्याचे संदिप गवई ‘ठरणार अनेकांची डोकेदुखी! सामान्य कार्यकर्त्याच्या उमेदवारीची चर्चाच लय भारी !

36
0

आशाताई बच्छाव

1000549695.jpg

मेहकर तालुक्याचे संदिप गवई ‘ठरणार अनेकांची डोकेदुखी! सामान्य कार्यकर्त्याच्या उमेदवारीची चर्चाच लय भारी !
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
मेहकर :-बुलढाणा तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांची तळगाळातील जनतेशी असलेली नाळ, व्यापक जनसंपर्क अन कामांचा पाठपुरावा करुन सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा घेतलेला ध्यास या गुणवैशिष्ट्यांमुळे सध्या मेहकर विधानसभेत संदिप गवई यांचे नाव चर्चिल्या जात आहे. रस्त्यावरचा कार्यकर्ता अशी ओळख असणारे व्यक्तिमत्व म्हणजे तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई, सामाजिक कार्यमध्ये विविध उपक्रम राबविणारे, रक्तदान शिबिरे,विवाह सोहळा,पुरस्कार सोहळा, गुणवंत विद्यार्थी सत्कार,शासकीय योजना, विद्यार्थीचे शालेय प्रश्न,शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न,महिला सक्षमीकरणाचे प्रश्न मार्गी लावणे तसेच गोरगरिबांच्या अडीअडचणीमध्ये धावून जाणे या गुणविशेषयावर ते निलेश लंके सारखे होऊ शकतात यावर आता चर्चा झडत आहे. विधानसभा निवडणुकीत हा भिडू अनेकांची डोकेदुखी ठरू शकतो. तिकडे निलेश लंके या सामान्य माणसाने प्रस्थापित व्यवस्थेशी दोन हात करून विजय मिळवला याला कारण ठरला तो त्यांचा रस्त्यावरचा अडीअडचणीला धावून जाणे, मेहकर मध्ये हॉस्पिटलचे कुठलेही काम असो वा सरकारी ऑफिस मधले काम असेल तर सर्वांना आठवतो तो रस्त्यावरचा कार्यकर्ता संदिप गवई तथागत ग्रुप संघटनेच्या माध्यमातून संदिप गवई गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहे. संघटनात्मक पातळीवर मोठं काम त्यांचे सुरू आहे. सध्या विधानसभेची लगीन गाई सुरू असून अनेकांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत जात आहेत. त्यामध्ये संदिप गवई हे नाव सुद्धा घेतले जाते. सध्या युती व महाआघाडीचे राजकारण सुरू आहे. जागा वाटपात जागा कुठल्या पक्षाला सुटणार हे गुलदस्ता असला तरी अनेकांनी मात्र आपली तयारी चालवली आहे. काही उमेदवार हे प्रस्थापित उमेदवार आहेत तर काही उमेदवारांना कुठलीही पार्श्वभूमी नाही. ते स्वकर्तृत्वाने पुढे येण्याचा प्रयत्न करीत आहेत. संदिप गवई हे मेहकर शहरातील
सामान्य कुटुबांमधील आहे कुठला ही राजकिय वारसा नसलेले ते सर्व समाजासाठी तथागत ग्रुप ह्या संघटनेच्यामाध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्रात एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे युवक आहेत मेहकरच्या राजकीय पटलावर उदय संघर्ष सामान्य माणसाच्या पावले आहे. हाकेला धावून जाणारा कार्यकर्ता अशी ओळख असणारे संदिप गवई हे आपल्या कामाच्या बळावर अनेकांच्या काळजात धडकी भरवू शकतात. सध्या राजकारणाचा ट्रेंड बदलला आहे. लोकसभा निवडणुकीत याची झलक दिसूनही आली. निलेश लंके हे त्याचे मोठे उदाहरण ठरलेत. कुठलीही पार्श्वभूमी नसताना एखादा रस्त्यावरचा सामान्य माणूस विधानसभेत जाईल हे तर दिवा स्वप्नच परंतु जिद्द आणि चिकाटी जनसामान्यांचा पाठिंबा असेल तर काय होऊ शकते हे लंके यांनी दाखवून दिले. मेहकर तालुक्यात लंके अशी वोळख असणारे संदिप गवई यांनी कंबर कसल्याने सद्या या कार्यकर्त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगत आहे.

Previous articleमोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी नगरपालिका झोपेतच का….
Next articleवासनांध! म्हणे.. नाही तर तुझा अश्लील फोटो व्हायरल करील.. – संत नगरी सह बुलडाणा चिखली शहरात घडले पाप !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here