Home जालना जाफराबाद तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी संपावर तालुक्यातील नागरिकांचे हाल

जाफराबाद तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी संपावर तालुक्यातील नागरिकांचे हाल

118
0

आशाताई बच्छाव

1000548485.jpg

जाफराबाद तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी संपावर तालुक्यातील नागरिकांचे हाल
जाफराबाद तालुका प्रतिनिधी-मुरलीधर डहाके दिनांक15/07/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद येथील तहसील कार्यालय महसूल कर्मचारी अचानक संपावर गेले असता नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसून येत आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्याकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन नागरिकांची होत असलेली अवहेलना थांबवावी. महसूल कर्मचारी संघटना बेमुदत काम बंद आंदोलन करणार असून त्यांच्या प्रमुख मागण्या, १) महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा.२) अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावेत.३) महसूल विभागाच्या आकृतीबंध तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पद भरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे.४) वेतन देयके उणे प्राधिकर पत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा.५) महसूल साहेबाचा ग्रेड पे १९००वरून २४०० करण्यात यावा.६) महसूल साहेब व तलाठी यांना सेवा अंतर्गत एकसमान परीक्षा पद्धती लागू करण्यात याव्यात.७) महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांची अधिसूचना दिनांक ०३०२-२०२३ नुसार तात्काळ अव्वल कारकून यांची वेतन निश्चित करण्यात यावी.९) महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा पुस्तिका लेखा अधिकारी वेतन पडताळणी पथका ऐवजी समक्ष असलेल्या महसूल विभागातील नियुक्त लेखाधिकारी यांचे वेतन पडताळणीचे अधिकारी मार्फत करण्यात यावी.१०) अव्वल कारकून या संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असे करण्यात यावे.११) नायब तहसीलदार संवर्गाचे ग्रेड वेतन ४८०० करण्यात यावा.१२) अवल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर अदलाबदली धोरणास नुसार पदस्थापना देण्यात यावी.१३) नायब तहसीलदार पदासाठी अवलकारकून मंडळ अधिकारी यांचे करिता पदोन्नती विभागीय परीक्षा सरळ सेवा याबाबतचे प्रमाणे ७०.१०.२० असे करण्यात यावे .१४) चतुर्थ श्रेणी शिपाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत असताना तलाठी संवर्गामध्ये २५% पदोन्नती देण्यात यावी.१५) कोतवाल पदांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा व कोतवालांना कोटा पदोन्नती वाढविण्यात यावा. महसूल कर्मचारी यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात जेणेकरून नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.

Previous articleम्हसरूळ येथे काल रात्री झालेल्या पावसात शेतकऱ्याचे अतोनात नुकसान
Next articleपोलीस पाटलांचे 700 रिक्त पदे भरा. अन्यथा आंदोलन छेडणार, बळीराजा फाऊंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here