Home जालना म्हसरूळ येथे काल रात्री झालेल्या पावसात शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

म्हसरूळ येथे काल रात्री झालेल्या पावसात शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

34
0

आशाताई बच्छाव

1000548483.jpg

म्हसरूळ येथे काल रात्री झालेल्या पावसात शेतकऱ्याचे अतोनात नुकसान
जाफराबाद तालुका प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
दिनांक 15/07/2027
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यात दिंनाक १४ रोजी रात्री झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने म्हसरूळ येथील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणत पिकांचे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने मका पीक जमीन दोस्त झाले आहेत.पीक जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी राजाने उराशी बाळगलेले स्वप्न एका क्षणात भंगले आहे.तोंडाशि आलेल्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.. म्हसरूळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर शेजूळ यांची मका पूर्ण पणे खाली पडलेली आहे. तरी शेतकरी वर्गातून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येत आहे. तहसीलदार साहेबांनी त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश द्यावे असे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे.

Previous articleभोकरदन येथील उपजिल्हारूग्णालयांच्या बांधकाला सुरवात करण्यात यावी या मागणी साठी अन्नत्याग उपोषण
Next articleजाफराबाद तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी संपावर तालुक्यातील नागरिकांचे हाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here