Home जालना भोकरदन येथील उपजिल्हारूग्णालयांच्या बांधकाला सुरवात करण्यात यावी या मागणी साठी अन्नत्याग उपोषण

भोकरदन येथील उपजिल्हारूग्णालयांच्या बांधकाला सुरवात करण्यात यावी या मागणी साठी अन्नत्याग उपोषण

27
0

आशाताई बच्छाव

1000548481.jpg

भोकरदन येथील उपजिल्हारूग्णालयांच्या बांधकाला सुरवात करण्यात यावी या मागणी साठी अन्नत्याग उपोषण

जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 15/07/2024
स्वराज्य संघटनेचे विकास जाधव यांचा इशारा…
भोकरदन येथील 30 खाटाच्या ग्रामीण रूग्णालयाचे 50 खाटाच्या उपजिल्हारूग्णालयात श्रेणीवर्धन झालेल्या रुग्णालयांचे बांधकाम सुरु करण्यातबाबत 28 जून 2024 रोजी दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने स्वराज्य संघटनेचे विकास जाधव यांनी 16 जुलै रोजी अन्नत्याग उपोषणाला सुरवात करणार असल्याचे त्यानी सांगितले,
प्रशासन व राजकीय नेत्याच्या उदासीन धोरणामुळे पाच वर्ष अगोदर मंजूर झालेले कामाची वीट ही रचली गेली नाही ही फार मोठी शोकांतिका असून ग्रामीण रुग्णालयांची ‘रेफर रुग्णालय’ अशी ओळख झाली आहे सत्ताधारी व विरोधक यांच्या राजकीय श्रेयवादात हे बांधकाम अडकलेले असल्याचे समजले सामान्य गरीब जनतेच्या आरोग्यसुविधा हयाच्या राजकीय स्वार्थासाठी, श्रेयवादापोटी अडकून बसल्या आहेत,
दिनांक 16 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन येथे अन्नत्याग उपोषण दरम्यान काही जिवीतहानी झाल्यास ह्यास प्रशासन व राजकीय लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील असे स्वराज्य संघटनेचे विकास जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here