Home बुलढाणा नवऱ्याचा बायकोत लय जीव ! दुसरा बायकोशी बोलला म्हणून केले कांड! मोताळा...

नवऱ्याचा बायकोत लय जीव ! दुसरा बायकोशी बोलला म्हणून केले कांड! मोताळा तालुक्यातील घटना..

33
0

आशाताई बच्छाव

1000548459.jpg

नवऱ्याचा बायकोत लय जीव ! दुसरा बायकोशी बोलला म्हणून केले कांड! मोताळा तालुक्यातील घटना..
युवा मराठा नूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलडाणा :-तू माझ्या बायकोशी का बोलतो असे म्हणत एका नवऱ्याने तिघांच्या मदतीने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. एवढेच नाही तर, मारहाण झालेल्या व्यक्तीने मलकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही त्याला रस्त्यात पकडून तक्रार का दिली ? असे म्हणत परत बेदम मारझोड केली NE याप्रकरणी बोराखेडी पोलीसांत चार जणांविरो गुन्हा दाखल झाला आहे.

विजय हरिभाऊ चितरंग असे तक्रारदार व्यक्तीचे नाव आने चितरंग हे मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे राहतात. ते A शेतकरी असून शेती खरेदी विक्रीचे एजंट म्हणून कामही करतात. ६ जुलै रोजी रात्री १० वाजता विजय चितरंग हे घरी असताना
६ जुलै रोजी रात्री १० वाजता विजय चितरंग हे घरी असताना गोपाल तुकाराम सांबारे व त्याच्यासह त्याचा साळा मोहन पंडित हे दोघे त्यांच्या घरी आले. या दोघांनाही चितरंग हे ओळखत असल्याचे त्यांनी तक्रारीत सांगितले. यावेळी, तू माझ्या बायको सोबत का बोलतो असे म्हणत गोपालने मारहाण करणे सुरू केले. त्याच्यासह मोहन पंडित याने देखील तेव्हा विजय चितरंग यांना मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देऊन दोघेही तेथून निघून गेले. त्यांनतर विजय चितरंग यांनी मलकापूर पोलीस ठाणे गाठत गोपाल सांबारे व मोहन पंडीत याच्या विरोधात तक्रार दिली.

यांनतर ८ जुलैला दुपारी ३:३० वाजता विजय चितरंग हे शेत पाहण्यासाठी शेलापुर येथे आले. शेलापुर मोताळा जाणाऱ्या मेन रोडवर ते उभे असताना तिथे गोपाल तुकाराम सांबारे, प्रसाद गोपाल सांबारे, गणेश सोनवणे व मोहन पंडित हे चार जण तिथे आले. आमचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार का दिली? असे म्हणत गोपाल आणि प्रसाद यांनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईपाने चितरंग यांच्या पायावर वार केले. मोहननेही हातापायावर लोखंडी पाईपाने मारहाण केली. गणेश सोनवणे याने लाकडी काठीने व दगडाने दोन्ही पायावर व पाठीवर मारहाण केली. चौघांनी मिळून विजय चितरंग यांना लाता बुक्यांनी बेदम मारझोड केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. असे विजय चितरंग यांनी तक्रारीत म्हटले आहे. A तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी चौघां विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here