Home गडचिरोली खा.डॉ.नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध कार्यक्रम!

खा.डॉ.नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध कार्यक्रम!

23
0

आशाताई बच्छाव

1000548427.jpg

खा.डॉ.नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध कार्यक्रम!

माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार,आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित..!

अहेरी/गडचिरोली ,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ): भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते व गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेबांचा वाढदिवस निमित्त काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार व सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी साहेबांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडले.

दरम्यान अहेरी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या प्रमुख उपस्थित अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप,नागेपल्ली सेवासदन दवाखान्यात रुग्णांना फळ,बिस्केट वाटप तसेच अहेरी शाळेतील विध्यार्थी – विध्यार्थींना पेन बुक चॉकलेट,कंकडालवार,मडावी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील गोरगरीब जनतेला साडी वाटप तसेच काही जनतेला आर्थिक मदत सुद्धा करण्यात आले.

यावेळी रज्जाक खान पठाण,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,स्वप्नील मडावी,चंद्रशेखर बेज्जलवार,बग्यश्रीताई बेज्जलवार ग्रामपंचायत सदस्य आलापल्ली,हनिप शेख,मधुकर सडमेक अहेरी विधानसभा एस.टी.सेल,सतीश कोरेत,जगताप कोरेत,किशोर सडमेक माजी पेसा अध्यक्ष,जावेद शेख,सतीश मडावी,विनोद मडावी,कोशोर सडमेक,जगपती सडमेक,संतोष येनगंटीवार,सचिन पंचार्य,नरेंद्र गर्गम,कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गेसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleमुख्यमंत्री लाडकी बहीण”योजनेला यशस्वी करण्याचा मविआचा डाव मोडण्याची मोहीम.
Next articleनागपूर येथील रवी भवन येथे रिपब्लिकन ऐक्यासाठी विविध आंबेडकरी गटांच्या राज्याध्यक्ष यांची सभा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here