Home अमरावती राज्यात आदिवासी साठी स्वातंत्र्य आयोग स्थापन केव्हा? सरकारला पडला विसर. आदिवासी विकास...

राज्यात आदिवासी साठी स्वातंत्र्य आयोग स्थापन केव्हा? सरकारला पडला विसर. आदिवासी विकास मंत्री लक्ष देतील का.

33
0

आशाताई बच्छाव

1000548392.jpg

राज्यात आदिवासी साठी स्वातंत्र्य आयोग स्थापन केव्हा? सरकारला पडला विसर. आदिवासी विकास मंत्री लक्ष देतील का.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
केंद्र सरकारच्या धरतीवर राज्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न व समस्यांचा आवका लक्ष घेता राज्य सरकारने ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी जनजाती सल्लागार परीक्षेच्या ५१व्या बैठकीत अनुसूचित जमातीसाठी स्वातंत्र्य आयोग स्थापन करण्यात मान्यता दिली. परंतु गत नऊ महिन्यापासून आजपर्यंत आयोगाची स्थापना करून कार्यानीवंत करण्यात आली नाही. त्यामुळे आदिवासी बाबत सरकारला विसर तर पडला नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ नुसार केंद्रा पूर्वी राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोग होता. भारत सरकारने ८९ वि घटना दुरुस्त करून अनुसूचित जाती व जमातीसाठी केंद्रात दोन स्वातंत्र्य आयोग निर्माण केले. याच धरतीवर राज्यातही स्वातंत्र्य आयोग स्थापन करण्यात आली असून अशी मागणी ट्रायबल फोरम, ट्रायबल वुमन्स फोरम या संघटनांनी सरकारकडे केली होती. पण अद्यापही आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया लाल फीतीत अडकून पडलेली आहे. परिणामी आदिवासींनी कोणाकडे न्याय मागायचा? असा प्रश्न राज्यातील आदिवासी जनतेपुढे निर्माण झाला राज्यात अनुसूचित जमातीसाठी स्वातंत्र्य आयोग स्थापन झाल्यास आदिवासींचे प्रश्न व समस्यांचे, होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे स्वातंत्रपणे निरसन होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आदिवासी समाजाबांधवाची आहे. त्यामुळे लवकरात लवकर अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करून आदिवासींना न्याय मिळावा असा सुरेखा उईके जिल्हाध्यक्ष ट्रायबल उमेन्स फॉर्मल अमरावती यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

Previous articleजाफराबाद तालुका अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
Next articleमुख्यमंत्री लाडकी बहीण”योजनेला यशस्वी करण्याचा मविआचा डाव मोडण्याची मोहीम.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here