आशाताई बच्छाव
जाफराबाद तालुका अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 14/07/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.कमी पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आले असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे. जून मध्ये पेरणी झाल्या पासुन आतापर्यंत सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.आता शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नदी,नाले, ओढे अजूनही कोरडे ठाक आहेत.कसे बसे पीक तग धरून आहेत. विहिरींना सुध्दा पाहिजेत असे पाणी आलेले नाही. त्यामूळे शेतकरी पाण्याच्या चिंतेत आहे की, पावसाचा खंड पडला तर पिक वाया गेल्या शिवाय राहणार नाही. हवामान तज्ज्ञ वेळोवेळी चुकीचे अंदाज व्यक्त करतात त्यामूळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.