Home बुलढाणा शिंगणे विरुद्ध शिंगणे रंगले राजकीय शीतयुद्ध – फेसबुक पोस्ट आली चर्चेत !

शिंगणे विरुद्ध शिंगणे रंगले राजकीय शीतयुद्ध – फेसबुक पोस्ट आली चर्चेत !

49
0

आशाताई बच्छाव

1000546382.jpg

शिंगणे विरुद्ध शिंगणे रंगले राजकीय शीतयुद्ध – फेसबुक पोस्ट आली चर्चेत !
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ

बुलडाणा
बुलढाणा :- राजकारणात प्रतिस्पर्धी वाढलेत. त्यामुळे कामे करणाऱ्यांनाच मतदार पसंती देतात. सिंदखेडराजा मतदार संघात तर आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे विरुद्ध गायत्री शिंगणे असे राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे.
हे राजकीय शीतयुद्ध फेसबुकवर रंगू लागले आहे.
नाव न घेता आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष हे मुळात कोणासाठी काम करतात ते जनतेला माहित आहे. त्यांना पक्षाशी काहीच देणंघेणं नाही. त्यांनी लोकसभेला कुणाचे काम केले हे महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्त्यांना माहिती आहे. पुढे त्या म्हणाल्या की, सिंदखेडराजा मतदारसंघात सर्वसामान्य, सर्व जातीय, सर्वपक्षीय मतदारांचा मला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सिंदखेड राजा मतदारसंघात मा. शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. महायुती सरकारची शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला विरोधी धोरणांमुळे जनतेत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. पवार साहेब वउद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत केलेला विश्वासघात जनता अजूनही विसरलेली नाही. हे महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेला दाखवून दिले आहे. आगामी विधानसभेला अजून मोठ्या प्रमाणात यांना धडा शिकवणार आहेत. राहिला विषय सक्षम उमेदवार असण्याचा तर कै. सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे व कै. मुन्ना शिंगणे यांच्या यांच्या कुटुंबात अजूनही ती ताकत आहे.

(कै. सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे हे अपक्षचं आमदार झाले होते ही गोष्ट जिल्हाकार्याध्यक्ष विसरलेले दिसतात) पोस्टमध्ये शेवटी त्या म्हणाल्या की, जिल्हा कार्याध्यक्ष यांना एक सल्ला आहे.. जे स्वतः च्या कुटुंबाचे नाही झाले ते तुमचे काय होतील.?जिल्हा कार्याध्यक्ष हे मुळात कोणासाठी काम करतात हे पूर्ण जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे, यांना पक्षाशी काहीच देणं घेणं नाही, यांनी लोकसभेला यांच्या धण्याच्या सांगण्यावरून कोणाचं काम केलं हे महाविकास आघाडीतील नेते तसेच कार्यकर्ते यांना तर माहिती आहेच, पण त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांना पण माहिती आहे.
मला मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघात
सर्वसामान्य, सर्वजातीय, सर्वपक्षीय मतदारांचा

मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून यांच्या मालकाच्या
पायाखालची वाळू सरकलीतर आहेच. आणि यांच्या
मालकांना हे पण माहिती आहे की महायुतीचे कार्यकर्ते
पण यांचं काम करणार नाहीत. त्यामुळे यांच्या
मालकांनी सांगितल्यानुसार हे बोलतात.
सिंदखेडराजा मतदारसंघात मा. पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. महायुती सरकारची शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला विरोधी असणाऱ्या धोरणांमुळे जनतेत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मा. पवार साहेब व मा. उद्धव ठाकरे साहेब यांच्यासोबत केलेला विश्वास घात जनता अजूनही विसरलेली नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेला दाखवून दिलं आहे, आणि विधानसभेला अजून मोठ्या प्रमाणात यांना धडा शिकवणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here