आशाताई बच्छाव
कुठे पडले तलवारीचे घाव ? – एक गंभीर, चौघांवर गुन्हा दाखल !
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
खामगाव बुलढाणा छोट्या-मोठ्या कारणांवरून खामगावात चाकू-तलवारी चालतात. जणू त्यांना चाकू तलवार चालविण्याचा सराव झाला आहे. खामगावच्या शेजारी असलेल्या घाटपुरी येथे शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात झालेल्या भांडणात तलवार चालल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अभिषेक सदाशिव घोपे (२९) रा. पुंडलिक नगर (घाटपुरी, खामगाव) यांच्या घरी ११ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान शेजारी राहणारे अंबादास साळोकार (४५), गजानन साळोकार (४०), सौ उषा अंबादास साळोकार (३४), प्रेम अंबादास साळोकार (सर्व रा. पुंडलिक नगर, घाटपुरी खामगाव) या चौघांनी करून अभिषेक घोपे याला अश्लील शिवीगाळ करत आवाज दिला. त्यामुळे अभिषेक घोपे हा आपल्या घराबाहेर आला होता.
हातात तलवार तर कीकार यांच्या
यावेळी अंबादास साळोकार यांच्या हातात तलवार तर उषा साळोकार, प्रेम अंबादास साळोकार यांच्या हातात लाकडी दांडके होते. गजानन साळोकार (४०) हा अभिषेक घोपेच्या घरात घुसला व अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी अभिषेक गोपे याचे हात पकडले व अंबादास साळोकार याने त्याच्यावर तलवारीने जोरदार वार केला. घोपे यांनी आपल्या डाव्या हाताच्या मदतीने तो वार अडवला मात्र त्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली आहे, तो हात फॅक्चर झाला आहे. यावेळी वरील चौघांनी त्याच्या पायावर, डोक्यावर लाकडी दांड्याने मारहाण केली आहे. अभिषेक घोपे याची पत्नी व साळा भांडण आवरण्यास गेले होते. त्यांना सुध्दा लाथा – बुक्क्यांनी मारहाण केली आहे. घोपे यांच्या लहान मुलांना सुद्धा मारहाण केली आहे. तशी तक्रार अभिषेक सदाशिव घोपे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश घुगे करीत आहेत.