Home बुलढाणा कोमलने विहीरीत उडी मारुन संपविले जीवन; बुलढाणा शहरातील घटना

कोमलने विहीरीत उडी मारुन संपविले जीवन; बुलढाणा शहरातील घटना

76
0

आशाताई बच्छाव

1000546283.jpg

कोमलने विहीरीत उडी मारुन संपविले जीवन; बुलढाणा शहरातील घटना
युवा मराठा नूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :-बुलढाणा शहरातील चैतन्यवाडी मधील 16 वर्षीय कोमलने विहीरीत उडी मारून जीवन संपविले. जोहना आणि कोमल दोघांच्याही आत्महत्येमागे कारण एकच आहे.. अभ्यासाचा ताणतणाव! शिरपूर येथील कोमल संदीप सुसर येथील एडेड विद्यालयात शिकत होती. तिचे वडील शेती करतात. पण मुलगी शिकावी म्हणून वडील आणि आई दोघेही चैतन्यवाडीत भाड्याच्या खोलीत राहत होते. आयसीआयसीआय बँकेच्या पाठीमागे श्री. मुळे यांच्या खोलीत मागील अनेक दिवसांपासून कोमल आपल्या आई- वडीलांसह राहते. तिचा मोठा भाऊ संभाजीनगरला इंजिनीअरिंग करतो. कोमलने पवार सायन्स कोचिंग क्लासमध्ये ट्यूशनही लावली होती. ट्यूशनवाल्यांनी घेतलेल्या टेस्टमध्ये कोमलला कमी मार्क पडले. त्यावरून ट्यूशनवाल्यांनी तिच्या पालकांना कळविले आणि काल रात्री यावरून कोमलच्या आईवडीलांनी कोमलला रागावले. कोमलला हा राग सहन

नाही. आज पहाटे उठून तिने आई-वडील झो
जतताना घरासमोरच असलेल्य विहीरीत उडी मारली.
नाहा. आज पहाट उठून तिन आइ-वडाल झापलल असतांना घरासमोरच असलेल्या विहीरीत उडी मारली. विहीरीला वरपर्यंत पाणी आहे. सकाळी 6 वाजेच्या सुमारास जेव्हा कोमलची आई उठली तेव्हा तिला मुलगी आढळून आली नाही. आजूबाजूला शोध ? घेण्यात आला. गल्लीत असलेल्या इतर नातेवाईकांनाही कळविले. काही सिसिटीव्ही फूटेज पाहण्यात आले. परंतु कोमलचा कुठेच पत्ता नव्हता. कोमलची चप्पल मात्र दरवाजासमोरच होती. त्यानंतर विहीरीत शोध घेण्यात आला. एकाने विहीरीत उतरून शोधले. परंतु कोमल मिळून आली नाही. थोड्या वेळाने अग्निशमन वाहन बोलावून विहीरीत गळ टाकण्यात आला. त्या गळाला कोमलचा मृतदेह लागला. कोमलला हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. परंतु तिचा जीव गेलेला होता. नवतरूण मुलीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने तिचे आई- वडील धाय मोकलून रडत आहेत. अनेक आई-वडील आपल्या पाल्यावर रागावतात. परंतु असे टोकाचे पाऊल उचलणे योग्य नव्हे.

Previous articleभाजीसाठी रस्त्यावर जीवाची बाजी ! – चिखली रोडवर भाजीपाल्या विक्रेत्यांची धूम..
Next articleबुलढाणा :- वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मंजुरी !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here