Home रायगड रोह्यातील कुंडलिकेने धोक्याची पातळी ओलांडली; भातशेती जलमय, लागवडीची कामं खोळंबली

रोह्यातील कुंडलिकेने धोक्याची पातळी ओलांडली; भातशेती जलमय, लागवडीची कामं खोळंबली

54
0

आशाताई बच्छाव

1000546262.jpg

रोह्यातील कुंडलिकेने धोक्याची पातळी ओलांडली; भातशेती जलमय, लागवडीची कामं खोळंबली

युवा मराठा न्यूज पोलादपूर / रायगड :-रफिक मुल्ला

रोहा तालुक्यासह ग्रामीण भागातील कोलाड, खांब, देवकान्हे, परीसरात शनिवारी १३ जुलै रोजी रात्रभर तसेच रविवारी पहाटे मुसळधार पाऊस पडला. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने दऱ्या खोऱ्यातील डोंगर माथ्यावरील नदी नाले. तुडुंब भरून वाहू लागले आहेत रोह्याची बारमाही वाहणारी कुंडलिका नदी, महिसदरा, तसेच आंबा नदी ही दुतर्फा तुडुंब भरून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून दुधडी वाहत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रोहा शहर अष्टमी येथे खबरदारी म्हणून जुना पूल वाहतुकीस रविवारी बंद करण्यात आला असून, नव्या पुलावरुन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे तर मुसळधार कोसलेल्या पावसामुळे या परिसरातील भातशेती जलमय झाल्याने बळीराजाची भातशेती लागवडीची कामे खोळंबली असल्याचे दिसून आले.

शनिवारी रात्री जोरदार पावसामुळे नदीच्या पात्रात मोठ्या

प्रमाणात पाणी येत असल्याने शहरात नगरपरिषदेने सायरन

वाजून नागरिकांना तसेच नदी काटेवरील ग्रामस्थांना संबधीत

खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तर रोहा अष्टमी जुन्या पुलावर पाणी आले होते. रविवारी सकाळी दुपारी रोहा अष्टमी पुलावर पाणी भरले जात असताना रोहा अष्टमीचा जुना पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. त्यामुळे नव्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे चालू ठेवण्यात आली होती. कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रोहाअष्टमी जुना पुलावरून रहदारी बंद राहवी यासाठी रोहा अष्टमी पुलाच्या दोन्ही बाजूस रोहा नगरपरिषद कर्मचारी व पोलीस तैनात करण्यात आले होते.

रोहा तालुक्यात तसेच कोलाड खांब देवकान्हे परीसरात तसेच विविध ग्रामीण भागात जोरदार झालेल्या पावसामुळे नदी नाळे कालवे तुडूंब वाहिल्याने काही शेतकऱ्यांची भात लागवडीची कामे मुसळधार कोसळत असलेल्या पावसात खोळंबली असल्याचे दिसून आले तर शेतात भरपूर पाणी साचल्याने बळीराजाला आपले पीक तसेच रोपटे वाचवण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती तर काही शेतकर्यांनी लागवड केलेली भात शेती अतिवृष्टी पूर पूरपरिस्थितीत वाहून जाते की काय याची चिंता लागवड केलेल्या बळीराजाला पडली आहे.

रोहा तालुक्यात जवळपास पन्नास टक्के हून अधिक शेतकर्यांची भात लागवडीची कामे पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे तर काही शेतकरी लागवडीच्या कामात व्यस्त असताना पुन्हा पावसाने जोरदार फटकेबाजी केल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने भातशेती जलमय झाल्याने बळीराजाची भात लागवडीची कामे खोळंबली असल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here