Home नांदेड डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा.

67
0

आशाताई बच्छाव

1000543234.jpg

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड, दि. 12:- 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात जागतिक लोकसंख्या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या दिनानिमित्त जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्यावतीने रांगोळी व पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकसंख्या वाढीचे दु्ष्परिणाम आणि लोकसंख्येचे नियंत्रण याची जनजागृती करणारे संदेश देण्यात आले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उप अधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण , डॉ. प्रकाश गट्टाणी, डॉ. आर.डी. गाडेगर, डॉ. आय.एफ. इनामदार, मेट्रन अलका जाधव, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख , पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी तसेच रुग्णालायातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती.

लोकसंख्या वाढीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, मानवी संसाधनाची दिवसेंदिवस वाढत जाणारी कमतरता, ज्यामुळे मानवी जीवनमानाचा स्तर खालावत जावून त्याचा सामान्य नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण व सर्वागिण विकासावर होणारा वितरीत परिणाम यावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रत्येकाकडून जनजागृती अधिक प्रभावीपणे करण्याची आवश्यकता असल्याचे मत अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमूख यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जन औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रकाश गट्टाणी यांनी केले. यावेळी त्यांनी लोकसंख्या वाढीची कारणे यावर भर दिला जसे कमी वयात लग्न लावणे, निरक्षरता, लिंगभेद, कुटुंब नियोजनाचा अभाव इत्यादी कारणामुळे आज लोकसंख्या वाढीचा आलेख हा उर्ध्वगामी दिसून येतो असे त्यांनी सांगितले. लोकसंख्या वाढीवर शासन स्तरावरुन तसेच नागरिकांनी व्यक्तीगत स्तरावरुन नियंत्रण आणण्यासाठी उपलब्ध शासनाच्या योजना आणि कार्यरत यंत्रणा यांच्या सहाय्याने प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. संतोष जोगदंड तर आभार डॉ. सुष्मिता वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन औषधवैद्यकशास्त्र विभागाच्य डॉ. सुष्मिता वाघमारे, डॉ. ज्योती भिसे, समाज सेवा अधीक्षक गजानन वानखेडे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका ममता उईके, निवासी डॉक्टर्स, आंतरवासिता विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.

Previous articleसर्व सामान्य कुटुंबातील बँक कर्मचाऱ्यांचा मुलगा सीए झाला : आई-वडिलांच्या कष्टाचे मुलाने पांग फेडला
Next articleमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यात 48 हजारावर अर्ज दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here