Home अमरावती अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या धसक्याने एसटी वाहतूक धामणगाव शहरातून पूर्ववत...

अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या धसक्याने एसटी वाहतूक धामणगाव शहरातून पूर्ववत सुरू.

44
0

आशाताई बच्छाव

1000540678.jpg

.अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या धसक्याने एसटी वाहतूक धामणगाव शहरातून पूर्ववत सुरू.
दैनिक युवा मराठा.
सचिन भाऊ ठाकूर
तालुका प्रतिनिधी.
धामणगाव रेल्वे (अमरावती.)
धामणगाव रेल्वे: गेल्या अनेक दिवसापासून एसटी महामंडळाच्या बसेस धामणगाव, अंजनसिंगी, कुऱ्हा रोड धामणगाव, विरुळ रोंघे, चांदुर रोड आणि धामणगाव, मंगरूळ रोडच्या बसेस हा धामणगाव शहरातून वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी शाळकरी विद्यार्थ्यांना धामणगाव येथील मंगरूळ फाट्यावरती बस मधून उतरून देऊन बायपासनी बसेस डेपो मध्ये जात होत्या. तीन किलोमीटर अंतर विद्यार्थ्यांना पायी चालून शाळा गाठत असताना शाळेला विध्यार्थीना उशीर होत होता व शाळा सुटण्याच्या आधी एक तास अगोदर शाळा सोडून बस पकडण्यासाठी तीन किलोमीटर डेपो मध्ये पायी जावं लागत होतं. त्याची तक्रार विद्यार्थ्यांनी व पालकांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज कडू यांच्याकडे केली असता त्यांनी भ्रमणध्वनीवरून आगर प्रमुख चांदुर रेल्वे व जिल्हा वाहतूक अधिकारी अमरावती यांच्याशी चर्चा करून शाळकरी विद्यार्थ्यांची परिस्थिती बघता वाहतूक शहरातून पूर्वरत करण्याकरीता विनंती केली. परंतु ही विनंती केली असता त्यांनी पोलीस प्रशासनाचे पत्र समोर करून धामणगाव शहरातून वाहतूक पूर्वरत करण्यास असमंती दर्शवली पोलीस प्रशासनाशी जिल्हाप्रमुख मनोज कडू यांनी संपर्क साधला असता. पोलीस प्रशासन व एसटी प्रशासन जिल्हा वाहतूक अधिकारी यांना 24 तासाची अवधी देऊन जर बसेस शहरातून पूर्ववत न झाल्यास रस्त्यावर एकही बस धाऊ देणार नाही .असा इशारा पोलीस प्रशासन व एसटी प्रशासनाला दिला व त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील असे कळविले होते. त्यानुसार आज सकाळी साडेसहा वाजता जिल्हाप्रमुख मनोज कडू तालुकाप्रमुख निलेश मुंदाने,शहर प्रमुख नरेंद्र देऊळकर, युवा सेना शहर प्रमुख शुभम ठाकरे, सुशील कडू व विद्यार्थ्यांच्या पालकांना सोबत घेऊन आंदोलनाची तयारी चालू असताना एसटी प्रशासन व पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रमुख मनोज कडून यांच्या इशाराचा धसका घेऊन लेखी पत्र काढून एसटी बसची वाहतूक शहरातून पूर्वरत सुरू केली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते सकाळी पहिली बस घेऊन शास्त्री चौक येथे पोहोचल्यानंतर चालक वाहकाचा हार घालू जिल्हाप्रमुख मनोज कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) घेतलेल्या भूमिकेमुळे विद्यार्थिनी व धामणगाव शहरातील नागरिकांना खूप दिवसापासून होत असलेल्या त्रासापासून सुटका मिळाली. पोलीस प्रशासन व एसटी प्रशासनाने विद्यार्थी व जनतेच्या हिताचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज कडू यांनी आभार व्यक्त केले . विद्यार्थ्यांच्या आनंद बघून विद्यार्थ्यांनी च्या आनंदात आज धामणगाव रेल्वे शिवसेना सहभागी झाली होती . याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश मुंदाने, शिवसेना शहरप्रमुख नरेंद्र देऊळकर, शिवसेना शहर संघटक संतोष गावंडे, युवा सेनेचे शहर प्रमुख शुभम ठाकरे, सुशील कडू शिवसेना शाखाप्रमुख रोशन कैकाडी, विद्यार्थ्यांचे पालक सुनील कडू, बंडू पाटील कडू, शाळा व्यवस्थापन समितीचे अशोकनगर अध्यक्ष सौ पूजा शेलोकर, सदस्य पूजा तिघरे अन्य पालक उपस्थित होते.

Previous articleलाडकी बहीण योजनेचे अर्ज !मिशन मोडवर. महानगरपालिका आयुक्त: झोन न्याय अधिकाऱ्यांना आदेश.
Next articleअखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या धसक्याने एसटी वाहतूक धामणगाव शहरातून पूर्ववत सुरू.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here